अहमदाबाद,३० ऑक्टोबर २०२२ – गुजरात मधील मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल अचानक कोसळला कोसळला असून त्यात जवळपास १४१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर यात आहे.तर २०० जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरु असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारनं दिली आहे. ब्रिटिशांच्या काळातील हा पूल आहे. पाचच दिवसांपूर्वी नूतनीकरण झालेल्या पूलाचे केबल तुटल्याने ही घटना घडली. १०० जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटनेवेळी ४०० जण उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.दुर्घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबादमधील रोड शो रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी मृतांच्या नातेवाईकांना तसेच घटनेतील जखमींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.
मोरबी मध्ये काल सायंकाळी ही मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात येतआहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान,५ दिवसांपुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मृतांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. मच्छू नदीत बचावकार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. SDRF सोबत NDRF च्या टीम देखील बचाव कार्यात गुंतल्या आहेत. तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. बचावकार्यादरम्यान नागरिकांचे मृतदेह आढळून येत आहेत. यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आज दुपारपर्यंत बचावकार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. बचाव कार्यासाठी केंद्रीय यंत्रणा सह अग्निशमन दल, तटरक्षक दल, गरुड कमांडो आणि नौदलाची मदत घेतली जात आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश मोरबी आणि आसपासच्या भागातील रहिवासी आहेत.
ऋषिकेशमधील राम आणि लक्ष्मणाच्या झुल्यासारखाच हा पूल होता. त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं लोक यायचे. रविवारी या पुलावर ४०० पॆक्षा अधिक लोक एकत्र जमल्यानं पुलाला भार सहन झाला नाही आणि पूल कोसळून नदीत पडला. १८८० मध्ये बांधण्यात आलेला पूल मोरबी येथील मच्छू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम १८८० मध्ये पूर्ण झालेलं. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते. या पुलाच्या बांधकामाचं सर्व साहित्य ब्रिटनमधून आलं होतं. बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटना पूर्वीपर्यंत या पुलाची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. या पुलाची लांबी ७६५ फूट होती. तर हा पूल १.२५ मीटर रुंद आणि २३० मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. हा भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता, त्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता. या पुलावर जाण्यासाठी १५ रुपयांचं शुल्क आकारलं जात होतं.
#Breaking: गुजरात के मोरबी में केबल पुल टूटा, करीब 400 लोग नदी में गिरे, कई के डूबने की आशंका#Gujarat #Morbi pic.twitter.com/xMiIZFl0j5
— News24 (@news24tvchannel) October 30, 2022