“भूमी”नाटकातून नाशिककर अनुभवणार जीवन समृद्ध करणारा अनुभव 

0

नाशिक,३ नोव्हेंबर २०२२ – फिजिकल थिएटर ह्या प्रकारात अदिशक्ति फाउंडेशन, पाँडिचेरी ही नावाजलेली संस्था जागतिक रंगभूमीवर संपुर्ण भारताचे प्रतिनिधित्व करत असते. संस्थेला ४० वर्षे पुर्ण होत आहे त्या निमित्ताने, संस्था एक नवं कोरं नाटक “भूमी” घेऊन भारताच्या दौऱ्यावर आहे, त्या अंतर्गत मुंबई, पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील तीन शहरांत ते सादरीकरण करणार आहेत.

विनयकुमार हे दक्षिणेतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते अदिशक्ति फाउंडेशन चे प्रमूख आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले आणि सारा जोसेफ यांनी लिहिलेले “भूमी” हे नाटक रसिकांसमोर येणार आहे. त्या निमित्ताने गीत, संगीत, नृत्य आणि अभिनय या सगळ्यांचा अविस्मरणीय मेळ असलेलं दक्षिनाट्य पाहण्याची संधी प्रथमच मिळत आहे. ही कलाकार मंडळी वर्षभर कसून तालिम करत, नविन वाद्य – नृत्य प्रकार शिकत सगळं लाईव्ह सादर करत असतात.जिवंत कलेचा हा वास्तुपाठ फक्त नाट्य रसिकांसाठीच नाही तर नाटक, नृत्य, संगीत या तिन्ही प्रांतातील रंगकर्मींसाठी एक केसस्टडी ठरणार आहे.

मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे हा आगळा वेगळा प्रयोग अभिजीत पाटील, मुंबई आणि फ्रेंड्स सर्कलचे जयप्रकाश जातेगांवकर ह्यांच्या सहकार्याने होत आहे.

जीवन समृद्ध करणारा हा अनुभव नाशिककर नक्कीच घेतील हयात शंका नाही. इंग्रजी भाषेत होणारा हा नाट्यप्रयोग कुठल्याही भाषेच्या पल्याड जात सर्वच रसिकांना मंत्रमुग्ध करतो. तिकिटं कालिदास कलामंदिर आणि ऑनलाईन bookmyshow वर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  या नंबर वर संपर्क करावा 9922064447 असे आवाहन जयप्रकाश जातेगांवकर यांनी केले  आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!