नवी दिल्ली – नाशिकचे खुला रंगमंच चे फाउंडर अभिनेता प्रथमेश अरुण जाधव यांची सांस्कृतिक मंत्री पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमेश जाधव यांची सांस्कृतिक मंत्री पदासाठी “महाराष्ट्र युवा संसद ” साठी निवड झाली आहे. नाशिककरांसाठी खूप मोठी गौरवाची बाब असून ते आता आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र आणि UNICEF आयोजीत ” महाराष्ट्र राज्य युवा संसद निवडणूक – २०२२ ” या मधे महाराष्ट्रातील ३६ जिल्हा नेहरू युवा केंद्र मधील ” नॅशनल युथ वॉलेंटियर्स ” फक्त २ व्यक्तीची निवड करण्यात आली. जे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. महाराष्ट्र राज्यातून एकूण ७२ युवाचे निवड करण्यात आले. या मधे निवडणूक घेण्यात आली. यामध्ये नाशिकचे खुला रंगमंच चे फाउंडर अभिनेता प्रथमेश अरुण जाधव यांची सांस्कृतिक मंत्री पदासाठी उमेदवारी जाहीर झाली.
युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय मधील सर्व UNICEF चे आधिकारी, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्राचे डायरेक्टर, नॅशनल युथ वॉलेंटियर्स यांनी मतदान केले.आणि सांस्कृतिक मंत्री साठी ९५% मतांनी प्रथमेश अरुण जाधव यांची सांस्कृतिक मंत्री पदासाठी “महाराष्ट्र युवा संसद ” साठी निवड झाली. येत्या १४ नोव्हेंबरला विधानभवनात शपथ विधी आणि विधानसभेतील कामकाजाचा आढावा या युवा मंत्री मंडळींना घेता येईल. आणि यातील बेस्ट पार्लमेंट पुरस्कार प्रदान करण्यात येईल. दिल्ली येथे आपले भाषण देण्याची संधी मिळेल.
आपले प्रश्न pml & mal सोबत माडता येतील. नाशिक साठी खूप मोठी बाब आहे. महाराष्ट्र राज्य युवा संसद -2022 साठी – अभिनेता – प्रथमेश अरुण जाधव यांची निवड झाली. या नाशिककरांसाठी खूप मोठी बाब आहे. यासाठी खुला रंगमंच वरील सर्व पदाधिकारी, नेहरू युवा केंद्र नाशिक च्या युवा सांस्कृतिक मंत्री प्रथमेश अरुण जाधव यांचा सत्कार करण्यात आला.