सौरभ अनामिकाची लिव्हइन मधील प्रेम कथा
प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी “तू तेव्हा तशी”
मुंबई,११ नोव्हेंबर २०२२ -पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. जे कधीही विसरता येत नाही. आयुष्यभरासाठी त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर…..? चाळीशी पार केलेल्या सौरभ -अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच “तू तेव्हा तशी”. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, आजच्या काळातली सगळयात हटके आणि लव्हस्टोरीचा नवा ट्रेण्ड असणारी मालिका “तू तेव्हा तशी”.
सौरभ अनामिकाच्या प्रेमाची नवीन सुरुवात होतेय . सौरभ मावशीला सांगतो की ते लग्न न करता लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून मावशी खूप चिडते आणि लिव्हइनमध्ये राहायचं असेल तर वाडा सोडून जा असं सौरभ ला ठणकावते.
सौरभच्या पाठीशी नेहेमी उभी राहणारी माई मावशी यावेळी सौरभला साथ देईल? हे सगळं चालू असताना अनामिका त्यांच्या नवीन घरात सगळ्यांना बोलवुन पार्टी देते. या सर्व घडामोडींनंतर आता सौरभ अनामिकाची लिव्हइन मधील प्रेम कथा पाहणे रोमांचक असणार आहे ‘तू तेव्हा तशी’ सोमवार ते शनिवार रात्री ११ :०० वा.झी मराठीवर.