नाशिक ,१३ नोव्हेंबर २०२२- नाशिक मधील पवार तबला अकॅडमी, कलानंद कथक नृत्य संस्था, आदिताल तबला अकॅडमी व के के वाघ कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् चे विद्यार्थी यांचा नुकताच मलेशिया दौरा यशस्वी झाला. आपली कला सादर करून त्यांनी मलेशियातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.मलेशिया येथे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान क्वालालंपूर,ब्रिकफिल्ड,मल्लका,कलांग येथे हे सांगीतिक कार्यक्रमा मध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
आनंदी अथणी,केतकी चौधरी,श्रावणी मुंगी,ऋतुजा चंदात्रे, तनिष्क तांबट,हिमांशू बर्वे,मंदार पवार, अदिती निलखे, अंकीता शिरसाठ, वैष्णवी जगताप, ऐश्वर्या गोखले, ध्रुव बालाजीवाले, आर्य देशपांडे या विद्यार्थ्यांनी तबला, गायन आणि कथक नृत्य यामधून आपली कला सादर केली, आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळविली. विविध भजने, ताल प्रस्तुती या द्वारे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.सुर संगीत म्युझिक सेंटर तर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मलेशिया तील श्री अरविंदर सिंग रैना यांचे विशेष सहकार्य लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांना नाशिकचे प्रसिद्ध कलाकार नितीन पवार,नितीन वारे,सुमुखी अथणी ,अविराज तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. हे कलाकार देखील या दौऱ्यात सहभागी झाले होते.