तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी जाधव यांचं अपघाती निधन 

0

कोल्हापूर,१३ नोव्हेंबर २०२२- अनेक मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारी ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी जाधव यांचं अपघाती निधन झालं आहे.कोल्हापूर-सांगली महामार्गावर हालोंडीजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाल्याचे कळते आहे.अपघाती मृत्यू झालाय. ही बातमी कळताच सिनेसृष्टीत शोककळा पसरलीये. अत्यंत कमी वेळामध्ये कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव हिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हॉटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना हा अपघात झाला त्यातच कल्याणीचा मृत्यू झाला.कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते.

७ तारखेला कल्याणीने स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी इंस्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट करून तिने एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. या पोस्टमधील तिने जे लिहिलं होत ते वाचून आता सर्वच भावुक होत आहेत.कल्याणी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असायची, ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असायची.

नक्की काय होती पोस्ट 
” काल माझा वाढदिवस होता मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्या साठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली… मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या…”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!