Nashik :”बालभारती”चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

0

नाशिक,२२ नोव्हेंबर २०२२- शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या बालभारती या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने कुसुमाग्रज प्रतिष्ठान द्वारा आयोजित सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव तसेच चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक नितीन नंदन यांच्याशी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांची व शालिमार येथील सारडा कन्या शाळेतील विद्यार्थिनींची संवाद साधला ग्रंथ मित्र विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात साधारणपणे बारावीपर्यंत उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे. सतत सखोल वाचन करावे व लेखन करून आपला शिक्षणाबाबतचा दर्जा उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले आवडते छंद प्रत्येकाने मनापासून जोपासावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी केले.पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांची व शालिमार येथील सारडा कन्या शाळेतील विद्यार्थिनींची संवाद साधताना अभिनेते सिद्धार्थ जाधव बोलत होते.

या प्रसंगी बालभारती चित्रपटातील कलाकार आर्यन मेंघजी, चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक नितीन नंदन यांच्यासह सर्व कलाकार उपस्थित होते. विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक यांच्याशी संवाद साधताना सिद्धार्थ जाधव म्हणाले की, बालभारती हा चित्रपट प्रत्येक कुटुंबात त्यांच्या मुलांच्या भोवती घडत असणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणारा आहे. मराठी माध्यमाच्या एका शाळेत शिकणाऱ्या आणि संशोधकाची भूमिका असलेल्या एका हुशार मुलाच्या संशोधनात आणि सादरीकरणात वारंवार येणारा भाषेचा अडसर आणि पालकांनी करून घेतलेला ग्रह या गोष्टीवर बालभारती चित्रपट आधारित आहे.

आपले वडील आणि मुलाचे जिव्हाळ्याचे प्रसंग ही चित्रपटात गमतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी पालक कुठेच कमी पडत नाही तसे चित्रपटातील बापाने केलेली धडपड या चित्रपटात प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. सर्वांनी आपल्या आई-वडिलांसह बालभारती हा चित्रपट पाहावा असे देखील आवाहन केले.

याप्रसंगी पेठे विद्यालयातील व सारडा कन्या विद्यालयातील सकाळ सत्रातील बाल गोपाळ यांनी अभिनेते सिद्धार्थ जाधव आणि बालकलाकार आर्यन याच्याशी मनमुराद गप्पा केल्या. अभिनेते जाधव यांच्यातील उत्साह पाहून मुलांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. मुला मुलींमध्ये जाऊन सिद्धार्थ जाधव यांनी त्यांना आनंद देण्याचा व प्रोत्साहित करण्याचा केलेला प्रयत्न व साधलेला संवाद कौतुकास्पद व मनाला आनंद देणारा ठरला.

Nashik : Actor Siddharth Jadhav interacted with students on the occasion of "Baalbharti" movie.

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह राजेंद्र निकम यांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनेते सिद्धार्थ जाधव दिग्दर्शक नितीन नंदन आणि बालकलाकार आर्यन व संयोजक विनायक रानडे यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान केला. यावेळी ग्लोबल व्हिजन स्कूलच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर ,ग्रंथ तुमच्या दारीच्या सदस्या तन्वी अमित,विवा नाशिक चित्र चळवळीचे प्रमुख जयेश आपटे संस्थेच्या पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील, सारडा शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका निकम ,उपमुख्याध्यापक राजेंद्र कापसे, संगीता थोरात,मनीषा पाटील ,रवींद्र पगार,दिलीप अहिरे,यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. संस्थेचे सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी ऑडिओ पार्टनर विपुल पाठक यांचे विशेष सहकार्य लाभले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.