मुंबई २४ नोव्हेंबर, २०२२ – बिग बॉस मराठीच्या घरात आज समृद्धी, अमृता धोंगडे, किरण माने आणि विकास एका विषयावर चर्चा करताना दिसणार आहेत, ज्यामध्ये समृद्धीने जाहीर केले ती या व्यक्तीला सपोर्ट करणार नाही. टास्क दरम्यान सदस्य एकमेकांशी चर्चा करताना दिसतात. ज्यामध्ये ते टास्क दरम्यान कोणती स्ट्रॅटेजि वापरली पाहिजे, कोणाला कसं बाजूला करता येईल याविषयी बोलताना आणि रणनिती आखताना दिसतात. समृद्धीचे म्हणणे आहे, आता मला रोहित झाला तरी चालेल अपूर्वा झाली तरी चालेल मी तेजाला सपोर्ट करणार नाही.
मी तिला चालता चालता बोलते आहे मी तुला काही करत नाहीये, त्यांच्यामधला नाही. दोनदा बोले मी. किरण माने म्हणाले, पहिल्यांदा अपूर्वाच्या पोत्यातले तिनेच काढले होते ना ? अमृता धोंगडेने विचारले, मग दुसऱ्यांदा काय झाले ? समृद्धी म्हणाली, तिला influence केलं त्यांनी आणि अक्षय आल्यावर… अमृता म्हणाली, स्नेहा आणि अक्षय तिला वरून सांगत आहेत, तेजस्विनीला… मला असं झालं हे कधी झालं ?आता यांचं नक्की काय म्हणणे आहे ? समृद्धीने तेजस्विनीला पाठींबा देण्यास का नकार दिला ? बघूया आजच्या भागामध्ये.
“हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस” – तेजस्विनी
बिग बॉसच्या घरात काल किरण माने यांची पुन्हा एंट्री होताच सगळी समीकरणं बदली. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी मध्ये कडाक्याचे भांडण झाले ज्यामध्ये अमृता म्हणून गेली, घरात सगळ्यात सेफ गेम खेळणारी व्यक्ती म्हणजे “तेजस्विनी लोणारी” आहे. तेजस्विनी म्हणाली, माझी चूक होते मी तुझ्याकडे नेहेमी येते आता. दोघींमधील मतभेद आणि भांडणं कधी मिटेल बघूया. काल घरात परतल्यावर किरण माने यांनी सदस्यांना दिलेल्या १ ते १० या क्रमवारीनुसार त्यांची जागा दाखवून दिली. बिग बॉस यांनी जाहीर केले किरण माने यांनी निवडलेल्या १ ते ५ क्रमावर असलेल्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळत आहे.
तेजस्विनी, रोहित, विकास, अपूर्वा आणि समृद्धी यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली त्यातून काल विकास आणि समृद्धी बाहेर पडले. आता कोण बनणार कॅप्टन्सीचे दोन उमेदवार ? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आज बिग बॉस यांनी सदस्यांवर “युध्द्व कॅप्टन्सीचे” हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत. बघूया काय होते या कार्यात. आणि बिग बॉस यांच्या पुढील आदेशापर्यंत किरण माने कॅप्टन म्हणून घराचा कार्यभार सांभाळतील असे देखील बिग बॉस यांनी जाहीर केले.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टास्क दरम्यान अपूर्वा आणि तेजस्विनीची शाब्दिक चकमक बघायला मिळणार आहे. अपूर्वा म्हणाली, एकच स्ट्रॅटेजि आहे आयुष्यभर डिस्ट्रॉय… तेजस्विनी म्हणाली, तोंड सांभाळ तुझं… अपूर्व म्हणाली, चिटर आहे चिटर तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. तेजस्विनी म्हणाली, हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस. अपूर्वा म्हणाली, मी नाही त्यातली, कडी लाव आतली चल… बघूया हे भांडणं अजून किती पुढे गेलं ते आजच्या भागामध्ये.
पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि VOOT वर कधीही