नाशिक,१ डिसेंबर २०२२ – नाशिक पोलिसांनी आज (१ डिसेंबर) पासून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारांचे अपघात वाढलेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा आजपासून नाशिक पोलिसांनी हेल्मेटसक्ती कडक करण्यात आलीय.नाशिककरांना आता हेल्मेट घालूनच प्रवास करावा लागणार आहे. असे पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहे. विविध उपक्रमानंतर आता थेट इ चलान कार्य प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे. आजपासून ही मोहिम तीव्र करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी नियमीत हेल्मेट वापरावे व दंड टाळावा असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
नाशिककरांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी अनेक क्लृप्त्या यापूर्वीही लढविल्या गेल्यात; मात्र तरीही बहुतांश नाशिककरांच्या अजूनही हेल्मेटला गांभीर्यानं घेतलेलं नाही. हेल्मेट डोक्यांवर कमी आणि दुचाकींच्या आरशांवर, तसेच पाठीमागे जास्त अडकविलेले अधिक पाहावयास मिळते असे चित्र काही दिवसापासून बघायला मिळते आहे.आता हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना थेट ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.
पोलिस आयुक्त म्हणाले की, शहरात विविध अपघातांमध्ये सातत्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी आम्ही विविध उपक्रम राबविले. रस्ते अपघातातील मृत्यू संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली आहे केली. दुचाकीस्वारांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. मात्र, त्याचा फायदा झालेला नाही. आता हेल्मेट सक्तीचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी शहराच्या विविध ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.वाहतूक पोलिस चौकात, सिग्नलवर आणि अन्य ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.