शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

0

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून, कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. हा व्यक्ती मुंबईत आला आल्याचे सांगून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलरने हिंदीत धमकी दिली आहे. धमकी दिल्यानंतर सध्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्धआयपीसीच्या कलम २९४, ५०६(२) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान मुंबई पोलीसांनी तक्रारीनंतर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध लागला आहे.मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारमधील रहिवासी आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता.बिहारमधून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलीस लवकरच ताब्यात घेणार असून उद्यापर्यंत मुंबईत आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादावर शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना धमकी आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होता.

दरम्यान बिहार मधून फोन करणारा व्यक्ती कोण आहे. शरद पवार यांना का धमकी देत होता. शरद पवार यांचा आणि संबंधित व्यक्तीचा संबंध काय आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने सिल्व्हर ओक’ वर फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असून, हा व्यक्ती बिहारचा असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील याच व्यक्तीने एकदा शरद पवार यांना धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं होतं. दुसरीकडे हा व्यक्ती वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!