मुंबई १६ डिसेंबर, २०२२ – बिग बॉस मराठीच्या घरात पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी सदस्यांवर सोपवणार आहेत “चैन पडेना आम्हांला” हे कॅप्टन्सी कार्य. आता यात कोण बाजी मारणार ? आणि कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? कि हे कार्य देखील सदस्य रद्द करणार ? हे आजच्या भागात कळेलच.
पण या कार्य दरम्यान अपूर्व आणि किरण मध्ये जरा मतभेद होणार आहेत. अपूर्वा किरणला सांगताना दिसणार आहे, मला इतकंच कळतं तुझ्या माझ्यात कितीही वाद झाला तरी तू जेव्हा जेव्हा कॅप्टन्सीसाठी उभा राहिला आहे किंवा जेव्हा तू खेळायला जातो ना तेव्हा तेव्हा मी आणि अक्षय तुझ्यासाठी उभे राहतो. माझ्यावरचा राग आहे ना तो माझ्यावर राहू दे. मी जेव्हा पण खेळत असतेना… किरण यांचे म्हणणे आहे, तुझ्यावर राग नाही माझा. अपूर्वा म्हणाली, जेव्हा मी खेळत असते ना मला कुठंलाही सदस्य Cheer Up करत नाही हे मी पहिल्या दिवसापासून accept केले आहे. पण जेव्हा अक्षय खेळतो तेव्हा अख्ख घर त्याच्या विरुध्द्व खेळतं आहे… तुझ्याकडून हि अपेक्षा नाही, बाकी मला काही म्हणायचं नाही. चूक तुझी नाही माझी आहे कि मी अपेक्षा करते. मी काहि फोर्स नाही करू शकतं. फक्त माझा राग माझ्यावर असुदे.
पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.