नाशिक – पाकिस्तान देशाचे विदेश मंत्री बिलावल जरदारी भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्य विधान करून सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत.भुट्टो याच्या या विधानाचा निषेध करत भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने रविवार कारंजा येथे बिलावल भुट्टो याच्या पुतळ्याचे दहन करून पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचेही दहन करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगात सर्व देशांमधे स्वीकारले असतांना पाकिस्तानच्या मंत्र्यांने असे निंदनीय वक्तव्य केल्याने भारत देशात सर्वत्र या घटनेचा निषेध होत असून भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल घोषणा देऊन भाजप कार्यकर्त्यांनी अतिशय तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करून पाकिस्तान आणि भुट्टोचा निषेध केला.
या आंदोलनात प्रसंगी खासदार डॉ.अनिल बोंडे भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे,आ.देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, देवदत्त जोशी,युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे,विजय बनछोडे,अजिंक्य साने,संतोष नेरे,पवन उगले, प्रतीक शुक्ल, भास्कर घोडेकर, भगवान काकड,फिरोज शेख,उत्तम उगले,सुरेश पाटील,रफिक शेख,रामहरी संभेराव, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, माधुरी पालवे, शाहीन मिर्झा, सुनिल देसाई,वसंत उशीर, शाम बडोदे, जितेंद्र चोरडिया,उदय जोशी,हर्षद जाधव,सागर शेलार,मुज्जमील मिर्झा,स्वाती भामरे, चित्रेश वस्पटे,नवनाथ ढगे,अंबादास पगारे, धनंजय पळसेकर, दत्ता शिंदे,अर्चना दिंडोरकर,लता राऊत,कविता तेजाळे,राजनंदिनी आहेर,संगीता जाधव, भारती माळी,नंदिनी रनबावळे, सतिष रत्नपारखी,प्रशांत वाघ,किरण गाडे,युवराज तेजाळे,ऋषिकेश डापसे,विजय गायखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.