नाशिक मधील बांधकाम व्यावसायिकांना स्वामीह फंडातून मदत करणार – इरफान काझी
नरेडको तर्फे आयोजित परिसंवादात स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांचे आश्वासन
नाशिक, दि. २३ डिसेंबर २०२२( प्रतिनिधी ) – ‘स्वामीह फंड ‘ हा केंद्र सरकारचा रियल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठीच उभारण्यात आलेला फंड असून त्याचे देशभरातील अनेक बांधकाम प्रकल्पांना मोठे सहकार्य लाभत आहे. या फंडातून अर्धवट राहिलेले गृहप्रकल्प तसेच अडचणीत आलेले आणि रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करता येऊ शकतात, असे प्रतिपादन स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांनी केले.
तसेच नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना काही अडचणी बांधकाम व्यावसायिक व विकासकांना कोणतीही अडचण आल्यास स्वामीह फंडातून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि. २३ रोजी प्रथम सत्रात आयोजित बांधकाम व्यवसायिक आणि विकासकांच्या परिसंवादात इरफान काझी बोलत होते.
यावेळी इरफान काझी यांनी सांगितले की, रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी आणि घर खरेदीदारांना अपार्टमेंटची वितरण सुनिश्चित करण्यासाठी वित्तपुरवठा करणे हा स्वामीह हा फंडाचा मुख्य उद्देश आहे. तसेच हा फंड रिअल इस्टेट क्षेत्रातील तरलता निर्माण करण्यात मदत करते आणि सिमेंट आणि स्टील सारख्या प्रमुख उद्योगांना चालना देतो. तसेच या फंडातून १२ टक्के व्याज दराने पैसे देण्यात येतात. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी जवळजवळ सर्व पैशांचे व्यवस्था यासाठी मिळते. गृह प्रकल्पाच्या एकूण खर्च पैकी कमीत कमी ३० टक्के खर्च झालेला असेल तर असा गृहप्रकल्प या फंडातील कर्ज मिळण्यासाठी योग्य ठरू शकतात, असेही काझी यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना काझी पुढे म्हणाले की, भारतात सुमारे साडेचार लाख युनीट प्रकल्प थांबलेले आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार युनीट प्रकल्पाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकल्पाला १५ कोटी पासून ४०० कोटी पर्यंत मदत स्वामी हा फंडातून करण्यात येते. नाशिकमधील आतापर्यंत चार ते पाच डेव्हलपर्स यांनी संपर्क साधला आहे. तसेच इतर विकासकांना काही अडचणी असल्यास त्यांनी स्वामी हा फंडासाठी अर्ज करावा, अशी आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी नरेडको नाशिकचे अभय तातेड, नरेडको सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांच्या हस्ते इरफान काझी विनीत चांडक अमित मकवाना आदींसह मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अभय साखरे यांनी केले.
याप्रसंगी राजन दर्यानी, नरेश कारडा, सुनील भायभंग, डी.जे. देसवाणी, विपुल नेरकर, मर्जीन पटेल, चेतन पटेल, रवींद्र पाटील, रवींद्र धनाईत,भाविक ठक्कर,प्रशांत पाटील, विपुल पोद्दार, आदिंसह मान्यवर उपस्थित होते.