“होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद : २ दिवसात १२५ फ्लॅटचे बुकिंग

प्रदर्शनाला " होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पोच्या ब्रँड ॲबेसॅडरअभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

0

नाशिक,दि. २४ डिसेंबर २०२२ – नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे ‘होमेथॉन प्रदर्शनाचे ‘ नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह मैदान येथे २२ डिसेंबरला उद्घाटन झाले. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर काही तासातच या प्रदर्शनात एकूण ५४ घरांचे बुकिंग झाले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशिक शहरात प्रथमच हे भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन सुरु झाले आहे.या प्रदर्शनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय दोन दिवसात प्रदर्शनात १२५ फ्लॅट बुक झाले.अशी माहिती प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली

काल या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले काल पासूनच नागरिकांनी या प्रदर्शनाला भरभरून बघण्यासाठी प्रतिसाद दिला आहे.डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर सात एकरच्या परिसरात उभारलेल्या या प्रदर्शनाला बघण्यासाठी नाशिक सह मुंबई पुणे इथूनही नागरिक सकाळ पासूनच गर्दी करत होते.

सर्वसामान्यांना आपले स्वतःचे सुंदर घर असावे,असे वाटते, या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. या ठिकाणी स्वप्नातील घर निवडण्याची सुवर्ण संधी नरेडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.अशा प्रतिक्रिया प्रदर्शनला भेट देणाऱ्या नागरिकांकडून मिळाल्या.

नरेडकोच्या होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ ” यशस्वी होण्यासाठी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड ,सचिव सुनील गवादे सह समन्वयक शंतनु देशपांडे अविनाश शिरोडे, राजेंद्र बागड ,पुरुषोत्तम देशपांडे, भाविक ठक्कर,अश्विन आव्हाड, श्रीहर्ष घुगे, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन, प्रयत्नशील आहेत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.