नरेडकोच्या “होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी”एक्स्पो”प्रदर्शनाची यशस्वी सांगता 

केवळ ४ दिवसात ३४२ सदनिकांची झाली बुकिंग ; सुमारे ६० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी दिली भेट...

0

नाशिक,दि.२६,डिसेंबर – नरेडकोच्या  होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली. या प्रदर्शनाला दि.२२ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून आज रविवार, दि. २५ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप झाला आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनास नाशिक मधील नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले ४ दिवस या प्रदर्शनाला सुमारे ६० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली. तसेच ४ दिवसात सुमारे ३४२ ग्राहकांनी घरांचे आणि शॉपचे बुकिंग केले आहे. एक प्रकारे गृह प्रकल्पाच्या पहिल्याच प्रदर्शनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरांची बुकिंग होण्याचा हा विक्रमच दिसून येतो.

विशेष म्हणजे या प्रदर्शनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सायंकाळी नरेडकोच्या होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपोला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार देवयानी फरांदे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Homethon 2022 Property Expo

या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर  नाशिकच्या विकासात संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबई, पुणे शहर पाठोपाठ आता नाशिक शहराचा देखील झपाट्याने विकास होत असून यामध्ये बांधकाम व्यवसायिकांचा मोठा वाटा आहे. मध्यमवर्गीयांना कमी दरात घरे उपलब्ध करून देण्याचा नरडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाच्या उद्देश निश्चितच सफल झालेला दिसतो. त्याचप्रमाणे या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या पसंतीची घरे घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. येत्या काळात नाशिकमध्ये आयटीपार्क, निओमेट्रो आणि विमान कनेक्टिव्हिटीसह अधिकाधिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शन भेटी प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

नाशिकच्या प्रश्नांकडे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचे लक्ष असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत असेही बावनकुळे यांनी सांगितले. तसेच येत्या काळात नाशिककरांना अधिकाधिक सोयी सुविधांचा लाभ घेता येईल आणि शहराची आणखी प्रगती होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोचे सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवयानी फरांदे व अन्य मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पदाधिकारी उपस्थित होते.

समारोप समारंभ… 

होमेथॉन प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोचे सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , सहसमन्वयक शंतनु देशपांडे, होमेथॉनचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, कु. ईशा चंदे होमेथॉनचे सहप्रायोजक व सिटी लिफ्टचे संचालक नवीन राजगोपालन, नरेडकोचे मार्गदर्शक राजन दर्यानी आणि सुनिल भायभंग, Enviro चे व्यवस्थापकीय संचालक हनुमान केदा देसाई, के नेस्टच्या प्रियंका यादव, युनियन बँक ऑफ इंडिया चे डेप्युटी जनरल मॅनेजर सुमेर सिंग,  आदींसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी राजेंद्र दर्यानी, सुनील भायभंग, अभय तातेड, सुनील गावदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक जयेश ठक्कर यांनी केले. यावेळी नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोचे सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांच्या वतीने प्रदर्शनाच्या प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला.

तसेच हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोचे सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांनी प्रचंड मेहनत घेतली याबद्दल नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदन दीक्षित व किशोरी किणीकर यांनी केले.

यावेळी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, भाविक ठक्कर, मयूर कपाटे, अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनातील अत्यंत महत्वाची पूर्ण बाब म्हणजे या प्रदर्शनात मुंबई, ठाणे, कल्याण येथील गृह प्रकल्पांचे स्टॉल असल्याने नाशिकच्या एका नागरिकांनी या प्रदर्शनात भेट देऊन  ठाण्यात घराचे बुकिंग केले.

दरम्यान, काल सायंकाळी  या प्रदर्शनास चांदवडचे आमदार देवयानी फरांदे,आमदार राहुल आहेर,  बांधकाम व्यवसायिक अशोक कटारिया, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, बांधकाम व्यवसायिक उमेश वानखेडे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,भाजपचे गोवा प्रभारी अजित चव्हाण,अनिल भालेराव,माजी नगरसेविका वर्षा भालेराव  आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन संयोजकांना शुभेच्छा दिल्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.