अहमदाबाद ,दि ३० डिसेंबर २०२२- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज पहाटे साडेतीन वाजता उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं. त्या १०० शंभर वर्षांच्या होत्या. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी म्हटलं. शानदार शताब्दीचं देवाच्या चरणी विश्रांती असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आईमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती दिसली. ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांबद्दल कटिबद्ध जीवन होतं.आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद कडे रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत १८ जून रोजी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला. गुजरात निवडणुकीआधी मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते.
हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आजच हिराबेन मोदी यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत. हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.