पवार तबला अकादमी तर्फे शनिवारी ‘तालाभिषेक बैठक’संगीत मैफिलीचे आयोजन

0

नाशिक,दि.११ जानेवारी २०२३ – पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी प्रथमच ‘तालाभिषेक बैठक ’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन केले गेले. दर दोन महिन्यांतून एकदा असे या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.

या मैफिलीत शनिवार दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सायं ६ वा कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे पूर्वार्धात नाशिकचा प्रतिभावान युवा सतारवादक आणि उ. शाकीर परवेझ तसेच उ. शाहिद परवेझ यांचे शिष्य प्रतीक पंडित याचे सतारवादन होईल. त्याला अद्वय पवार तबला साथ करतील. उत्तरार्धात प्रसिद्ध तबलावादक पं. ओंकार गुलवडी (मुंबई) यांचे एकल तबलावादन होणार आहे.त्यांना प्रशांत महाबळ संवादिनी साथ करतील.

पं. ओंकार गुलवडी हे कै. पं. तारानाथ राव यांचे शिष्य असून आकाशवाणीचे A ग्रेड कलाकार आहेत. नुकताच त्यांना वाद्यसंगीतातील महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. देश विदेशात स्वतंत्र तबलावादन आणि साथ संगत यासाठी त्यांचा नावलौकीक आहे.

कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शिअल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!