विश्वनाथ बोदडे,नाशिक
मागील आठवडा आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजाराने एक नवीन उच्चांक गाढला, त्याला विविध कारणे कारणीभूत ठरली, त्यामध्ये प्रामुख्याने देशभरात होत असलेले लसीकरण त, कोविडची कमी झालेली संख्या आणि मुख्य म्हणजे विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन मध्ये दिलेली शिथिलता याचा परिणाम बाजारावर जरी दिसला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका जपान चायना या देशांमध्ये ज्या प्रकारे आर्थिक घडामोडी घडत आहेत त्याचे सुद्धा पडसाद भारतीय शेअर बाजारांमध्ये बघायला मिळाले.
मागील आठवड्यामध्ये बाजारात विविध क्षेत्रांच्या सर्व भागांमध्ये चांगली मागणी दिसली त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1689 अंकांनी वधारून 54277 या सर्वोच्च पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 455 अंकांनी वधारून 16238 या पातळीवर बंद झाला तर तारा बँकिंग शेअर म्हणून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक तब्बल 1224 या अंकांनी वधारून 35809 या पातळीवर बंद झाला.
बाजाराचे जाणकार सांगत आहेत की पुढील आठवडा संमिश्र स्वरूपात राहू शकतो कारण उंच स्थरावर काही क्षेत्रांच्या समभागांमध्ये नफा वसुली बघायला मिळू शकते परंतु त्याच बरोबर मिड कॅप स्मॉल कॅप आणि ज्या समभागांचे फंडामेंटल प्रॉफिट रेशो, हातात चांगली कॅश आहे अशा सर्व भागांना मागणीसुद्धा बघायला मिळेल त्याच बरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोक डाऊन चे नियम अजून शिथील केले तर जे क्षेत्र काही अंशी बंद आहेत आणि ते क्षेत्र जर सुरू करण्यास परवानगी दिली तर त्या क्षेत्रांच्या समभागांमध्ये चांगली मागणी बघायला मिळू शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या आर्थिक घडामोडी घडत आहेत त्याचे सकारात्मक परिणाम बाजारात बघायला मिळतील त्याच बरोबर कच्चा तेलाच्या किमती घसरत असल्यामुळे इंधनाच्या दरात घट होऊन महागाई कमी होण्यास मदत होऊ शकते त्याचा सुद्धा परिणाम बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळू शकेल.
सध्या बाजारामध्ये आयपीओ च्या माध्यमातून सेबी बऱ्याच कंपन्यांना मंजुरी देत असताना दिसत आहे ,यामध्ये विविध स्तरावरील गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत परंतु मागील आठवड्यात तत्वचिंतन या कंपनीने सूचिबद्ध होतांना गुंतवणूकदारांना शंभर टक्के पेक्षा जास्त परतावा दिला तर दुसरीकडे ग्लेनमार्क सायन्स या कंपनीने पाच टक्के एवढा परतावा दिला सहा ऑगस्टला चार आयपीओ भरण्याची शेवटची तारीख होती त्यालासुद्धा रिटेल आणि विविध स्तरावरील गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.मागच्या आठवड्यामध्ये असे पण चित्र बघायला मिळाले की एकीकडे आयपीओ मध्ये भरमसाठ पैसा आला तर दुसरीकडे प्रत्यक्ष शेअर बाजारांमध्ये सुद्धा चांगल्या मागणीमुळे खरेदी दिसली व सर्वच निर्देशांक उंच स्थरावर बंद झालेले दिसले.
बाजारातील जाणकार सांगत आहेत की जरी भारतीय शेअर बाजार आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतांच्या आधारावर चढ-उतार दाखवत असला तरी स्थानिक स्तरावर सुद्धा ज्या आर्थिक घडामोडी घडत आहेत त्याचे पडसाद बाजारामध्ये नक्कीच आपण बघत आहोत यामध्ये प्रामुख्याने जीएसटी च्या माध्यमातून सरकारी तिजोरी मध्ये जमा झालेला पैसा, पी एम आय डेटा आणि आरबीआयचे धोरण हे कारणे दिसत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजार जरी उंच स्थरावर असला तरी आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये विभागून करावी आणि बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबावे.
कमोडिटी बाजाराचा विचार केला तर मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या किमती एका रेंज मध्ये दिसल्या तर चांदीच्या किमती काही प्रमाणात घसरलेल्या दिसण्यात आणि क्रूड ऑइल मध्ये चांगलीच घसरण बघायला मिळाली त्याच बरोबर डॉलरच्या किंमती सुद्धा खाली आलेल्या बघायला मिळाल्या.
Date NF. Sensex BNF
02.08.+455 +363. +125
03.08 +248 +872. +497
04.08. +128 +546. +820
05.08. +16. +123. -193
06.08. -56. -215. – 25
संपर्क – 8888280555