सिन्नर जवळ साईभक्तांच्या बसला भीषण अपघात : १० जणांचा मृत्यू : ३० ते ४० जण जखमी

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर : अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश

0

नाशिक, दि. १३ जानेवारी २०२३ – सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ साईभक्तांच्या बसला भीषण अपघात झाला असून ट्रक (एम.एच.48टी.1295) आणि खासगी आराम बसचा (एम.एच.04एस. के. 2751) यांची सामोरा समोर धडक झाली या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

या बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील ५० प्रवासी बसमधून शिर्डीकडे जात होते. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघाल्या होत्या, त्यातील एका बसचा अपघात झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते.

३५ ते ४० प्रवासी उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यात मृतांचा देखील समावेश आहे अपघाताची माहिती कळताच विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर . जिल्हाधिकारी गंगाथरण व जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप घटनास्थळी पोहचले आहेत.

अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही अपघातग्रस्त वाहनांचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा प्रवाशांनी बचावासाठी एकच आकांत केला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर : अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश
नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

मृतांची नावे पुढीलप्रमाणे :

१) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-४५,

२) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,

३) श्रावणी सुहास बारस्कर,वय ३०,

४) श्रध्दा सुहास बारस्कर, वय-४

५) नरेश मनोहर उबाळे,वय-३८ या सर्व रा.अंबरनाथ

६) बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५

७)दिक्षा संतोष गोंधळी, वय-१८ रा.कल्याण

८) आयुष्मान ऊर्फ साई प्रशांत महंती, वय-५ वर्ष

९) रोशनी राजेश वाडेकर, वय-३०

उर्वरित एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!