नाशिक,१४ जानेवारी २०२३ –हिंदवी स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र मांडणारे अद्वितीय महानाट्य नाशिक मध्ये आयोजित करण्यात आले आहे. महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित आणि जगदंब क्रिएशन आयोजित या महानाट्याचा दणदणीत प्रयोग छत्रपती संभाजी नगर मध्ये मागील महिन्यात पार पडला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतचा दिव्य इतिहास या २.३० तासांच्या महानाट्यात मांडण्यात आला आहे. येत्या २१ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ या दरम्यान या महानाट्याचे प्रयोग स्व.बाबूशेठ केला मैदान, साधूग्राम, तपोवन नाशिक येथे आयोजित केले आहे.श्री महेंद्र वसंतराव महाडिक लिखितव दिग्दर्शित आणि डॉ. अमोल कोल्हे अभिनित या महाराष्ट्राचे प्रयोग गेल्या अकरा वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रातील विविध शहरांसोबत महाराष्ट्राबाहेर गोव्यामध्ये देखील झाले आहेत.शिवशंभूची प्रेरणा समस्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हे महानाट्य अविरत काम करत आहे.
डॉ. अमोल कोल्हे या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज भूमिका साकारणार असून ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक हे बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे यासोबतच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाई ची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड या महानाट्य देखील येसुबाई ची भूमिका साकारणार आहे. सोबतच अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत रमेश रोकडे,कवीकलशांचं भूमिकेत अजय तकपिरे व आणि दिलेरखान व मुकर्रबखानच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडते यांचा दमदार अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतची अंगारगाथाया महानाट्यामध्ये मांडण्यात आली आहे. संध्याकाळी 6 ते 10 होणाऱ्या प्रयोगाचा तोच प्रयोग प्रत्येक दिवशी दाखवण्यात येणार आहे.
प्रेक्षकांमधून डॉ. अमोल कोल्हे यांची चित्तथरारक घोडेस्वारी,नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा आणि आतिषबाजी, तडाखेबाज संवाद, तीन मजली भव्य दिव्य किल्ल्याचा रंगमंच, दीडशे कलाकार, 22 फुटी जहाजावरून केलेली जंजिरा मोहीम, छत्रपती संभाजी महाराज आणि अनाजी पंतांची जुगलबंदी, थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी गनिमी काव्याने बुऱ्हाणपूर मोहीम, जिवंत तोफा या वैशिष्ट्यांसह सिनेकलावंत आणि नाशिक शहरातील शंभरपेक्षा अधिक स्थानिक कलाकार या महानाट्यात काम करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेले आशिया खंडातील एकमेवाद्वितीय भव्यदिव्य महानाट्य तब्बल पंधरा वर्षांनी नाशिककरांच्या भेटीला आले आहेत. आपल्या येणाऱ्या भावी पिढीला आपल्या छत्रपती संभाजी महाराज इतिहास कळवा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी एकदा तरी हे महानाट्य पहावे असे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले आहे.