नाशिक,१६ जानेवारी २०२३- नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.नंदकुमार देशपांडे संचलित सरगम सुगम आकादमी तर्फे नाशिकमध्ये प्रथमच ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ गायक संजय पत्की यांचे मार्गदर्शनासह संगीताचे धडे या कार्यशाळेत मिळणार आहे. शनिवार दि. २१ जानेवारी व रविवार दि.२२ जानेवारी २०२३ सकाळी १० ते ४ या वेळेत नाशिकच्या सिटीसेंटर समोर लक्षिका हॉल मध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अभ्यास पुर्ण गाणे कसे असावे ,गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन,गाण्याचा सराव,आवाजाचे प्रशिक्षण,गाण्याचे तंत्र, गाण्यामागची भावना, लय, सुर, ताल गाण्यामधील बारकावे अशा अनेक विषयावर संगीतकार अशोक पत्की यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.तरी सर्व नाशिक मधील तसेच नाशिक बाहेरील सर्व संगीतप्रेमीनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरगम सुगम चे संचालक श्री नंदकुमार देशपांडे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी ९८५०७७१८५७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे ही आवाहन नंदकुमार देशपांडे यांनी केले आहे.
तसेच शनिवारी दिनांक २१ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सरगम थिएटर प्रस्तुत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सप्तसूर माझे या सुमधुर गीतांच्या मैफिलीचे आयोजन कालिदास कलामंदिर नाशिक येथे करण्यात आले आहे. या मैफिलीत हृषिकेश रानडे,माधुरी करमरकर ,अमृता दहिवेलकर यांचा सहभाग असणार असून कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर करणार आहेत. तरी रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.