
नवी दिल्ली – अंतराळातील गोष्टींबाबत आवड असणाऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे.अंतराळात एक अशी घटना घडणार आहे जी अत्यंत रंजक असणार आहे.एक विशाल धूमकेतू सूर्याजवळून होऊन पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार आहे. १ फेब्रुवारी २०२३ ला तो पृथ्वीच्या सर्वाधिक जवळुन जाणार आहे आणि या दिवशी आपण हा धुमकेतू ऊघड्या डोळ्यांनी पाहु शकणार आहोत.
उत्तर दिशेला पहाटे हा हिरव्या रंगाचा हा धुमकेतू दिसेल.हा धूमकेतू पृथ्वीच्या इतक्या जवळून जाईल की तुम्ही डोळ्यांनी त्याला पाहू शकाल. हा धूमकेतू १ फेब्रुवारीला पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हा पाहायचा असेल तर तुम्ही टेलिस्कोपने त्याला आणखी जवळून पाहू शकाल. हा धूमकेतू ५० हजार वर्षात पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळ येणार आहे.जे गेल्या ५० हजार वर्षात कधीही झालेलं नाही.
जर त्या दिवशी पूर्ण चंद्र निघाला तर हा धूमकेतू दिसण्याबाबत संशय आहे. याचा शोध अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या ज्विकी ट्रांझीएंट फॅसिलीटीने लावला आहे. याला पहिल्यांना गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुरु ग्रहाजवळून जाताना पाहण्यात आलं होतं. या धूमकेतूचं नाव C/2022 E3 (ZTF) ठेवण्यात आलं आहे. धूमकेतू हे बर्फ, गॅस आणि दगड यांच्यापासून बनला असतो, त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित होतो, असं खगोलीय शास्त्रज्ञ निकोलस बीवर यांनी सांगितलं.
धुमकेतू म्हणजे काय?
धुमकेतू हा दगड, बर्फ, गॅस यांनी बनललेला असतो सुर्यापासून अधिक दूर म्हणजे जेव्हा तो ऊर्ट क्लाऊड मध्ये असतो त्यावेळी तो संपुर्णपणे बर्फाने गोठलेल्या अवस्थेत असतो परंतू जेव्हा तो सुर्याच्या जवळ येतो तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे वितळण्यास सुरूवात होते. या वितळण्याच्या क्रियेत वेगाने जाणार्या धुमकेतूच्या पाठीमागे शेपटी तयार होते जी सुर्यप्रकाशामुळे प्रकाशित झालेली दिसते.



