नाशिक,२४ जानेवारी २०२३ – प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५५ वी विठुसावळी नाट्यकृती संगीत ‘देवबाभळी’ नाटकाचा शुभारंभ २२ डिसेंबर २०१७ मराठी रंगभूमीवर झाला. २०१८ पासून सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त नाट्यकृतीमधून मराठी रंगभूमीवर नाशिकच्या प्राजक्त देशमुख (लेखक, दिग्दर्शक), आनंद ओक (संगीतकार), प्रफुल्ल दीक्षित (प्रकाशयोजना), शुभांगी सदावर्ते (आवली) यांचे यशस्वी पदार्पण झाले.
त्याचप्रमाणे, भद्रकालीची ५८ वी out of the box नाट्यकृती ‘देवमाणूस’ २६ डिसेंबर २०२२ रोजी मराठी रंगभूमीवर दाखल झाले. मुंबईतील शुभारंभाच्या प्रयोगानंतर देवमाणूस नाटकाचा नाशिक मधील शुभारंभाचा प्रयोग गुरुवार २६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे सादर होणार आहे.
या नाटकाद्वारे नाशिकच्याच शंतनू चंद्रात्रे (लेखक), जयेश आपटे (दिग्दर्शक), शुभम जोशी (संगीतकार), अपूर्वा शौचे (वेशभूषा), प्रणव प्रभाकर (अभिनेता), आशिष चंद्रचूड (अभिनेता), ऋतुजा पाठक (अभिनेत्री) आणि श्रीपाद देशपांडे (अभिनेता) यांचे मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले.भद्रकालीची ही नाट्यकृती नाशिकच्या मातीतील आहे आणि विशेष म्हणजे हे नाटक नाशिकच्या डॉ. भरत केळकर यांच्या स्वानुभवावर आधारित आहे.