नवी दिल्ली,१ फेब्रुवारी २०२३ – निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर करण्यात आला.
मोदी सरकार २.० आपल्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करत आहे. त्याचवेळी भाजपने अमृतकालच्या या अर्थसंकल्पासाठी विशेष योजनाही तयार केली आहे. पुढील १२ दिवस भाजपकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल, हे सांगण्यात येईल. या विशेष मोहिमेचे नेतृत्व भाजप नेते सुशील कुमार मोदी करणार आहेत. भाजपचा हा प्रचार १ फेब्रुवारीपासून म्हणजेच अर्थसंकल्पाच्या घोषणेपासून सुरू होणार असून १२ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आधीच अर्थसंकल्पातील सार्वजनिक आवाहन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- अर्थसंकल्पातील मुख्य सात उद्दिष्टांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘सप्तर्षी’ संबोधले. या ‘सप्तर्षी’मध्ये सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश करण्यात आला आहे.
- कोविन अॅप, यूपीआयमुळे जगाने आता भारताचे महत्त्व मान्य केले.
- ११.७ कोटी शौचालयं, उज्जवला योजनेतंर्गत ९.६ एलपीजी कनेक्शन, १०२ कोटी लोकांसाठी २१२ कोटी कोरोना लसी, ११.४ कोटी शेतकऱ्यांना पैशाचं थेट हस्तांतरण करण्यात आली.
- भारताची अर्थव्यवस्था जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे
- EPFO मधील खात्यांची संख्या वाढली
- महिलांचे आर्थिक सबलीकरण, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा विकास
- देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उभारणार पर्यावरण संवधर्नसाठी विशेष प्रयत्न
- हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान देणार
- ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार
- ३८८०० शिक्षकांची नियुक्त आदिवासी विकास मिशन अंतर्गत होणार
- एकलव्य निवासी शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार
- अॅग्रीकल्चर क्रेडिट टार्गेट वीस लाख कोटी रुपये करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव
- गरीब कैद्यांच्या जामिनासाठी आर्थिक मदत केली जाणार
- पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात येणार
- पीएम आवास योजनेचा फंड ६६ टक्क्यांनी वाढवला, ७९ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार
- कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठीचा निधी ३३ टक्क्यांनी वाढवत १० लाख कोटींपर्यंत वाढवला
- रेल्वेसाठी २.४० लाख कोटींचे बजेट, २०१३ वर्षाच्या तुलनेत ९ पटीनं बजेट वाढवले
- केंद्र सरकार राज्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा एका वर्षासाठी वाढवणार आहे
- ग्रीन ग्रोथ वर या अर्थसंकल्पाचा भर असणार आहे. शून्य कार्बन उत्सर्जनासाठी योजना आखणार
- सरकारी ३५०००कोटींची भांडवली गुंतवणूक
- २०३० पर्यंत केंद्र सरकार ५ मेट्रिक टन हायड्रोजनचे उत्पादनाचे लक्ष्य.
- पॅन कार्डला आता ओळखपत्र म्हणून मान्यता
-
नवीन टॅक्स प्रणाली अस्तित्वात
- ३ ते ६ लाखावर ५ टक्के टॅक्स
- ६ ते ९ लाखावर १० % टॅक्स
- ९ ते १२ लाख रुपयांवर १५% टॅक्स
- १२ ते १५ लाखावर २० % टॅक्स
- १५ लाखाच्या वर ३० %टॅक्स
- आयकराची मर्यादा ५ लाखावरून ७ लाख करण्यात आले आहे.
- ७ लाखापर्यंतचे वैयक्तिक उत्पन्न कर मुक्त
-
या वस्तू झाल्या स्वस्त :
- देशात मोबाइल उत्पादन वाढले जाणार असून उत्पादनांना बळ देण्यासाठीआयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे.
- कॅमेरा लेन्स, बॅटरीसाठी आवश्यक असणारे लिथियम आयनवरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे.त्यामुळे मोबाईल,कॅमेराच्या लेन्सेस स्वस्त होतील.
- इलेक्टिक वाहने स्वस्त,
- सायकल स्वस्त होणार,
- खेळणी स्वस्त होणार
- एलईडी टीव्ही स्वस्त होणार
-
या वस्तू महागल्या :
- सोने ,चांदीच्या दागिन्यांसह ,चांदीची भांडी महाग होणार
- सिगरेट महागणार
- विदेशी किचन चिमण्या महागणार