Union Budget 2023 : पुढील २५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट असलेला अर्थसंकल्प

विश्वनाथ बोदडे 

0

मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिप्ट..! : मात्र अदानींचा शेअर मार्केटमध्ये घसरण थांबू शकला नाही

विश्वनाथ बोदडे 

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प भारताची पुढील पंचवीस वर्षाची ब्ल्यू प्रिंट असलेला अर्थसंकल्प आहे असे सांगण्यात आले त्याच बरोबर अर्थसंकल्पातील मुख्य सात उद्दिष्टांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘सप्तर्षी’ संबोधले. या ‘सप्तर्षी’मध्ये सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश करण्यात आला आहे.

या वस्तू होणार स्वस्त
लिथियम-आयन बॅटरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी
टीव्ही पॅनलच्या खुल्या विक्री भागांवरील कस्टम ड्युटी 5% वरून 2.5% पर्यंत
मोबाईल फोन निर्मितीसाठी काही भागांवर कस्टम ड्युटी कमी
हिऱ्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या सीडवरील शुल्क कमी
निर्यातीला चालना देण्यासाठी सरकार कोळंबी खाद्यावरील कस्टम ड्युटी कमी

या वस्तू होणार महाग
सिगारेटवर कर १६ टक्क्यांनी वाढ
कंपाऊंड रबरवरील शुल्क १०% वरून २५% पर्यंत वाढले.
चांदीच्या वस्तूवर कस्टम ड्युटी वाढवली.
विदेशी किचन इलेक्ट्रिक चिमणीवर कस्टम ड्युटी ७.५% वरून १५% झाली

सार्वत्रिक विकास
शेवटच्या घटकापर्यंतचा विकास
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
प्रत्येक क्षेत्राला विकासाची जोड देण्याची क्षमता
ग्रीन ग्रोथयुथ पावरआर्थिक क्षेत्राचा विकास

प्रत्येक बजेटमध्ये सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात त्याचप्रमाणे ह्या बजेटमध्ये सुद्धा ग्रामीण व शहरी भागाची जोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आजच्या बजेटचे प्रमुख उद्दिष्ट म्हटले तर करा मध्ये जे बदल करण्यात आलेले आहे त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले व यामुळे सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी बघायला मिळाली.
सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त याचा फायदा नोकरदारांना मोठ्या प्रमाणात मिळू शकतो नवीन करत प्रणाली खालील प्रमाणे असणार आहे.

ज्या व्यक्ती चे वेतन ७ लाख पेक्षा कमी असेल त्यांना ० टॅक्स असेल.
ज्या व्यक्ती चे वेतन ७ लाख पेक्षा जास्त  असेल त्यांना …..
१) 0 ते 3 लक्ष पर्यंत *0%* टॅक्स.
२) 3 लक्ष ते 6 लक्ष पर्यंत *5 %* टॅक्स
३) 6 लक्ष ते 9 लक्ष पर्यंत *10%* टॅक्स
४) 9 लक्ष ते 12 लक्ष पर्यंत *15%* टॅक्स.
५)12 लक्ष ते 15 लक्ष पर्यंत *20%* टॅक्स.
६) 15 लक्ष पासून पुढे  *30%* टॅक्स.

तसेच सिटीजन अकाउंट ची क्षमता साडेचार लाखावरून नऊ लाखापर्यंत करण्यात आलेली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. विशेषतः कृषी स्टार्टअप सुरू करण्यासाठी ग्रामीण भागात कृषी वर्धक निधीची स्थापना केली जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात प्रामुख्याने १५७ नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार असून त्याचबरोबर विविध टेक-ऑटो क्षेत्रातील घोषणा देखील केल्या आहेत.

बाजारात जोरदार स्वागत परंतु अदानीं मुळे शेअर बाजारात घसरण 

आज सकाळपासूनच शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण होते त्यातच अर्थसंकल्प सुरू झाला त्यात अजून काही प्रमाणात भर पडली परंतु जेव्हा अर्थमंत्री यांनी करप्रणाली आर्थिक क्षेत्राबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा शेअर बाजारात जोरदार तेजी आली परंतु अर्थसंकल्प संपला आणि त्यानंतर एक तासाने अदानीं शेअर संबंधी बाजारामध्ये न्यूज आली आणि त्यामुळे बाजार नाकारात्मक कक्षेत गेला आजच्या बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले अदानीचे शेअर्स लोवर सर्किटला लागलेले होते बाजारातील तज्ञांचे मत असे आहे की गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणुकी लांब पडण्यासाठी करायला हवी ट्रेडर बनण्यापेक्षा गुंतवणूकदार बनावे यामुळे आपले कॅपिटल काही प्रमाणात सेफ राहते व लांब अवधीसाठी आपल्याला चांगला परतावा मिळण्याची शक्यता दिसत असते.

NIFTY १७६६२ + १३
SENSEX ५९५५० + ५०
BANK NIFTY ४०६५५ + २६७

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 
SBIN ५५७ + ४%
M&M १३७७ + ३%
POWERGRID २१८ + ३%
ULTRACEMCO ७०८३ + ३%
ADANIPORTS ६१३ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

BAJFINANCE ५८८४ – २%
TCS ३५५८ – २%
TECHM १०१६ – २%
BRITANNIA ४३२५ – २%
HDFCLIFE ५८० – २%

यु एस डी  आई एन आर $ ८२.००२५
सोने १० ग्रॅम      ५६५६०.००
चांदी १ किलो     ६८१३०.००
क्रूड ऑईल         ६३१३.००

Vishwanatha Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.