Nashik :आईला बेशुद्ध करून तीन महिन्याच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या 

0

नाशिक,दि. २१ मार्च २०२३ – नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आता कळस गाठत आहे.शहरात सामान्य माणसाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.आज शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातपूर परिसरात सोमवारी रात्री उघडकीस आली आहे.सदर घटना गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगापूर-सातपूर लिंक रोड येथील धृवनगर परिसरात घडली असून त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धृवांशी भूषण रोकडे (वय ३ महिने) असे हत्या झालेल्या चिमुकलीचचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-सातपूर लिंक रोड येथील धृवनगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि ३ महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या.

या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली.या महिलेने धृवांशी हिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. आई बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर महिलेने पलंगावर झोपलेल्या तीन महिल्याच्या निरागस धृवांशीचा धारदार शस्त्राने गळा चिरला. काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. त्यांनी आपल्या सूनेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघितले.

दुसरीकडे चिमुकली नात धृवांशी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. हा संपूर्ण प्रकार बघताच, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच धृवांशीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

महिलेवर संशय व्यक्त
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पथकासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुठल्या कारणातून झाली याबाबत पोलिसांनी तपस सुरू केले. मात्र मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस अधिकारी घटनास्थळी तपास करत होते. मुलीची आई शुद्धवीर आली असून पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. मात्र ह्या तीन महिन्याचा लहान चिमुकलीची हत्या का केली याची माहिती अजून देखील मिळालेली नाही अधिक तपास पोलीस करत आहेत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!