इशरे नाशिक चॅप्टर अध्यक्षपदी गोविंद नायर,सचिव पदी वरुण तिवारी
नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहोळा संपन्न
नाशिक,दि. १९ एप्रिल २०२३ – वाढत्या शहरीकरणामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे एअर कंडीशनिंगची गरज वाढत असून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आगामी वर्षात इशरे (इंडियन सोसायटी फॉर हीटिंग, रेफ्रीजरेटींग अॅंड एअर कंडीशनिंग इंजिनिअर्स )या संस्थेद्वारे डीकार्बनायझिंग व स्कीलिंग यावर भर दिला जाणार असल्याची माहिती इशरेचे उपाध्यक्ष निशांत गुप्ता यांनी दिली.ते इशरे नाशिक चॅप्टरच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी विभागीय संचालक मनीष गुलालकटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदग्रहण समारंभात नूतन अध्यक्ष गोविंद नायर यांनी मावळते अध्यक्ष मुरलीधर गायधनी यांच्याकडून पदभार स्वीकारला.
निशांत गुप्ता पुढे म्हणाले की,२३-२४ चे संस्थेचे ब्रीदवाक्य ‘एंगेज,एजुकेट व एलीवेट’ असे असून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य सुरु आहे.देशभरात संस्थेचे ५० चॅप्टर असून २५००० हून अधिक व्यावसायिक संस्थेशी जोडले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
पदग्रहणानंतर नुतन अध्यक्ष गोविंद नायर म्हणाले की इशरे हि संस्था शासकीय यंत्रणा तसेच विविध अन्य संस्थांसोबत कार्य करत असून या उद्योगात रोजगार व व्यवसायाच्या असंख्य संधी आहेत.विद्यार्थी चॅप्टर व स्कील सेन्टरच्या माध्यमातून या मनुष्यबळास प्रशिक्षित करण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखवला. ईशरे चे नूतन सचिव वरून तिवारी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या नाशिक मधील विस्तार योजनेची माहिती दिली
इशरे नाशिक चाप्टर ची(२३-२४) ची नूतन कार्यकारिणी अशी-
अध्यक्ष – गोविंद रमण नायर ,
प्रेसिडेंट इलेक्ट –अशफाक कागदी ,
आय.पी.पी. – मधुसूदन मुरलीधर गायधनी ,
सचिव –वरुण तिवारी ,
कोषाध्यक्ष –शामसुंदर जनार्दन कापसे,
सदस्य-उदय बागाजी भालेराव, झीशान नाझीर पठाण, स्टॅनली रोनाल्ड फर्नान्डोस,गुलामहुसैन मोहम्मद ढोलकवाला, सारंग सुरेश दीडमिशे, प्रवीण सुधाकर पातुरकर, रोहिणी मराठे, प्रवीण बाबुराव कामले, डॉ.अनिता बोराडे, अनिकेत चौधरी