ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण द्वितीया. वसंत ऋतू, शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
उत्तम दिवस. चंद्र नक्षत्र – अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- कामाची दगदग जाणवेल. मात्र धनलाभ होईल. आध्यत्मिक लाभ होतील. दूरचे मित्र भेटतील.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात. अधिक मेहनत करावी लागेल.
मिथुन:- आर्थिक लाभ होतील मात्र समाधान होणार नाही. प्रवासात त्रास संभवतो. वृद्ध मंडळींची चिंता लागून राहील.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. प्रेमात यश मिळेल. मात्र एखादी नकोशी बातमी ऐकायला मिळू शकते.
सिंह:- घरात शांतता राखा. पत्नीची चिंता वाटेल. मन मोकळे कराल.
कन्या:- यश देणारा दिवस आहे. सौख्य लाभेल. नोकरांकडून कटू अनुभव येऊ शकतो.
तुळ:- कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. इष्ट देवतेची उपासना करा. लॉटरी सारख्या ठिकाणी नुकसान संभवते. संततीची काळजी वाटेल.
वृश्चिक:- घरात कटकटी होऊ शकतात. शेतीची कामे रखडतील. संयम ठेवा.
धनु:- खर्चात वाढ होऊ शकते. अनितीकारक कामात वेळ वाया जाऊ देऊ नका. मानसिक ताण जाणवेल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. उत्साही वाटेल. कमी बोलणे हिताचे आहे. कौटुंबिक सुखात कमतरता जाणवेल.
कुंभ:- कामाच्या ठिकाणी प्रतिकूल अनुभव येईल. सहकारी नाराज राहतील. तणाव वाढेल.
मीन:- जेष्ठ व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. आध्यत्मिक प्रगतीसाठी योग्य कालावधी आहे. दानधर्म कराल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
