prsanna

भावार्थ दासबोध -भाग ३९ 

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

नाना व्यथांचे निरसन होण्यासाठी कडू औषध व ते  बळजबरीने दिले जाते याला आधिभौतिक म्हणतात. नाना वेलींचे रस, काढे, कडवट डोस घेतल्याने जीव कासावीस होतो त्याचे नाव आधिभौतिक. जुलाब आणि वांतीवर औषध देतात, कठीण पथ्य सांगतात, अनुपान चुकले तर कठीण संकट आहे, असे सांगतात याचे नाव आधिभौतिक. गाठीवर शस्त्रक्रिया करणे, तप्त सळईने डाग देणे, त्यामुळे प्राण्याला दुःख होते याचे नाव आधिभौतिक. तप्त सळीने डाग देतात, बिब्बे घालतात, नाना दुःखांनी दुःख होते.  जळवा लावतात याचे नाव अधिभौतिक. खूप रोग, खूप औषधे त्याच्या आठवणीने देखील प्राणी दुखावतो याचे नाव अधिभौतिक.

पंचक्षरीला बोलावले की तो धूर निर्माण करून नाना यातना देतो याचे नाव अधिभौतिक. दरोडे घालून दरोडेखोर जाताना यातना देतात त्यामुळे मनाला दुःख होते याचे नाव आधिभौतिक. आगीचा चटका बसतो त्यामुळे दु:खी प्राणी ओरडतो, त्रास झाल्यास विव्हळतो याचे नाव आधिभौतिक. नाना सुंदर मंदिरे, त्यातील नाना रत्‍नांचे भांडार, मनोहर वस्त्रे आगीत खाक होतात. नाना धान्य, नाना पदार्थ, नाना पात्रे, नाना अर्थ, माणसे जळून खाक होतात. शेतामध्ये आग लागते. धान्य, गवताच्या गंजी, मळणीला आलेले धान्य, कोठार, ऊस अकस्मात जवळून जाते. अशी आग लागली किंवा कोणी लावली, पोळले की हानी झाली, आग ठाणे झाली  याचे नाव अधिभौतिक.असे अनेक प्रकारचे अग्नीचे आघात त्यामुळे दुःखामुळे चित्र विचलीत होते त्याचे नाव अधिभूतिक. हरवतं, विसरत, सांडतं, नासतं, गहाळ होत, तुटतं, पडतं, असाध्य होतं याचे नाव आधिभौतिक.

नाना प्राणी स्थानभ्रष्ट होतात, पशु हरवतात, कन्या पुत्र गहाळ होतात याचे नाव आधिभौतिक. दरोडेखोर किंवा वैरी अचानक संहार करतात, घरे लुटतात, गोधन पळवून येतात याचे नाव अधिभौतिक. नाना धान्य, केळी कापून नेतात, पानमळ्यात मीठ घालतात असे नाना आघात करतात याचे नाव अधिभौतिक. पेंढारी, काळीजखाऊ लोक,  किमयागार, भुलवणारे लोक दरोडेखोर अचानक लुटतात. वाटमारे लोक द्रव्य घेऊन पळून जातात, नाना अलंकार काढून नेतात, उंदीर नाना वस्तू पळवतात याचे नाव आधिभौतिक. वीज पडते, थंडी पडते, पावसात प्राणी सापडतो, एखाद्यावेळी महापुरात बुडतो याचे नाव अधिभौतिक.भोवरे, वळणे आणि धार, पुरात लाकडे विंचू अजगर वाहून जातात त्यात प्राणी सापडतो. खडकाच्या बेटावर अडकतो. बुडता बुडता वाचतो. मनासारखा संसार नाही, कुरूप कर्कश्य क्रूर स्त्री ,विधवा कन्या, मूर्ख पुत्र याचे नाव आधिभौतिक. भूतपिशाच्च लागलं, अंगावरून वारे  गेले,  चुकलेल्या मंत्राने प्राणी बावचळला,याचे नाव आधिभौतिक.

ब्रह्मसंबंध शरीरामध्ये अनेक वर्षांपासून त्रास देतो, शनि महाराजांचा धोका होतो याचे नाव आधिभौतिक. नाना ग्रह, काळवार, काळतिथी, घातचंद्र, घातवेळ, घातनक्षत्र याचे नाव अधीभौतिक. शकुन पाहण्याची उपयोगी असलेले पक्षी पिंगळा आणि पाली, होला, कावळा यांच्यामुळे निर्माण होणारी काळजी म्हणजे अधिभौतिक. (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!