
नाशिक,१४ मे २०२३ – सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहिर केलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या यादीत नाशिकचे ज्येष्ठ लेखक विवेक गरुड यांची निवड झाली आहे.नाशिक मधून निवड झालेले ते एकमेव रंगकर्मी आहेत.
विवेक गरुड यांची अनेक नाटके रंगमंचावर गाजली आहेत.त्यात राजीचा मोर,इतिहासाच्या पुस्तकाची पाने कापून रोजच्या आयुष्याला चिकटवलेली चित्रकथा,फ्लॅश बॅक अन्ड सिक्वेन्स अशा अनेक नाटकाचा समावेश आहे.या अगोदरही विवेक गरुड यांनी विविध संस्थांच्या नाट्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे,अँबस्ट्रक्ट हा त्यांचा फॉर्म असून त्यांची नाटके विचार करायला भाग पाडतात.अत्यंत वेगळ्या शैलीतील नाटककार म्हणून ते महाराष्ट्राला परिचीत आहेत. त्याच्या निवडीमुळे खऱ्या अर्थाने नाशिकला न्याय मिळाला अशी भावना रंगकर्मींमध्ये आहे.रंगकर्मी प्रयोग परिक्षण मंडळात या अगोदर त्यांनी दोन टर्म कामगिरी केली आहे.
दर महिन्यात नव्या दमाच्या नाटककरांच्या संहिता वाचणं आणि महाराष्ट्र भरच्या रंगकर्मींना एकत्र भेटणं हा आनंदाचा भाग आहे.नवे प्रवाह,नवे विषय,नवे फॉर्म वाचणं आणि त्यावर सकारात्मक चर्चा घडणं महत्वाचं आहे.तसेच अप्रस्तुत विषय,भाषा आशय,यांना सर्व बाजुने चर्चा करुन प्रतिबंध करणं हेही महत्वाचे कार्य आहे.नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधी असल्याने नव्या संहितांना व संघाना मदत करता येईल याचा आनंद आहे.
विवेक गरुड


