रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी कलिंगड ठरतेय गुणकारी

फळातील 'अमायनो ॲसिड'ने लाभ

0

सगळीच मोसमी फळे आरोग्यदायी असल्याने त्याचे आवर्जून सेवन करण्याचे तज्ज्ञांकडून सुचवले जाते. त्यातही उन्हाळ्यापूर्वीच दाखल होणारे आणि जवळजवळ संपूर्ण उन्हाळ्यात उपलब्ध असणारे कलिंगड किंवा टरबूज हे रक्तदाब नियंत्रणासाठी काकणभर जास्त उपयोगी असल्याचा अभ्यास नुकताच समोर आला आहे. विशेष म्हणजे अधिक पाणी, कमी उष्मांक व ‘अमायनो अॅसिड’ लक्षणीय प्रमाणात असलेल्या कलिंगडाचे सेवन हे मधुमेहींसह सर्वांनीच केले पाहिजे अशी माहिती नाशिक च्या सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे वरिष्ठ हृदयरोगतज्ञ आशुतोष साहू यांनी दिली

सद्यस्थितीत शहरातील कोणत्याही रस्त्यावर नजर टाकली तर कुठे ना कुठे कलिंगडाची हमखास विक्री होत असल्याचे दिसून येते . एकीकडे कलिंगड भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने त्याची किंमतही सामान्यांच्या आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. साहजिकच सध्या आठवड्यातून एखाद्या तरी कलिंगडावर ताव मारण्याची संधी बहुतेकांच्या वाटयाला येत असल्याचे दिसून येत आहे.यंदा भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने त्याची किंमत तुलनेने कमी आहेच;शिवाय त्याचे शरीराच्या दृष्टीने होणारे लाभदेखील जास्त असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासात हि बाब समोर आली आहे आणि अमेरिकेच्या पाक्षिकातही हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.या अभ्यासात मुळात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना कलिंगड खाण्यास देण्यात आले आणि त्यामुळे त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाल्याचे १२ आठवड्यांच्या शास्त्रीय अभ्यासात समोर आले.

आशुतोष साहू पुढे म्हणाले की,प्रत्येक फळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्याचे चांगले लाभ आपल्या शरीरावर होत असतात.तसेच कलिंगडामध्ये ‘अमायनो अॅसिड’ असते आणि त्यामुळे उच्च रक्तदाब काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होते.हृदयरोगासाठी कलिंगड उपयुक्त ठरते.मुख्य म्हणजे कलिंगडामध्ये ९१ टक्के पाणी असते आणि पुन्हा त्यात कमी म्हणजे केवळ १२७ उष्मांक असल्याने त्याचे सेवन सर्वजण करू शकतात.

मीठ कमी, अधिक फळे खावीत
मिठात सोडियम असते, तर फळांमध्ये पोटॅशियम असते आणि दोन्हींचे संतुलन शरीरासाठी गरजेचे आहे. त्यामुळे कमीत कमी म्हणजे तीन ते पाच ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात मीठ नको, याची पक्की खुणगाठ बांधून घेत ,अधिकाधिक मोसमी फळांचे सेवन करणे नेहमीच हिताचे ठरते.अर्थात,केवळ टरबूज नव्हे तर सर्वच मोसमी फळांचा लाभ होत असतो,याकडे त्यांनी लक्ष वेधले

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!