नाशिक,दि.२० मे २०२३ –नाशिक मिसळ क्लब च्या कलाकारांचे वीकेंड कलर्स हे समुह कला प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक प्रा. राजन गवस यांच्या हस्ते आज कोल्हापूरातील सराय कला दालनात संपन्न झाले.
सध्याच्या राजकारणातले दडपण आणणारे पक्षीय रंग आणि कलाकारांच्या मनांतले सौंदर्यानुभूती रंग यातला फरक सांगून, भविष्यात, हे कलाकारांचेच रंग समाजात सकारात्मक बदल घडवून आणतील असा आशावाद राजन गवस यांनी यावेळेस व्यक्त केला.उदघाटनानंतर चित्रकार धनंजय गोवर्धनेंनी, नाशिक मिसळ क्लब विषयी माहिती सांगितली.
धनंजय गोवर्धने, चारुदत्त (सी एल) कुलकर्णी, नितीन बिल्दीकर, योगेश जोशी आणि सचिन पाटील, या कलाकारांच्या चित्र आणि छायाचित्रांचा या प्रदर्शनात सहभाग आहे.
उद्घाटनास,श्री व्यंकटेश बिदनूर,मिलींद रणदिवे,सिकंदर नदाफ, मुकुंदराव देशपांडे, डॅा.पी जी कुलकर्णी,जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी उपप्राचार्य अप्पासाहेब नेहते पाटील, गौतमी खडकतकर, अर्जुन खडकतकर, कोल्हापूरच्या रेखाटन समूहाचे कलावंत,कलानिकेतन चे विद्यार्थी इ.अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
हे प्रदर्शन रसिकांसाठी प्रदर्शनदि १९,२०,२१ मे रोज सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:३० पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.