लंडन –स्वयंपाक घरात खोदकाम करतांना एका जोडप्याला ३०० वर्ष जुनी सोन्याची नाणी मिळाल्याने एक जोडपे एका रात्रीत कोट्याधीश झाले आहे.ही दुर्मिळ नाणी किचनच्या फरशीखाली पुरुन ठेवलेली होती. हे जोडपं त्यांच्या घरात दुरुस्तीचे काम करत होते, तेव्हा त्यांना ही नाणी सापडली. ही नाणी नुकतीच एका लिलावात विकली गेली आहेत.ही नाणी सुमारे ७ कोटी रुपयांना लिलावात विकली गेली आहे.
नॉर्थ यॉर्कशायर, यूके येथे एका घरात जोडप्याला २६४ सोन्याची नाणी सापडली आहेत.खोदकाम केल्यानंतर तिथून काही शिक्के बाहेर पडायला लागले. मीडिया रिपोर्टनुसार हे शिक्के एका कपमध्ये ठेवले होते. किचनच्या फरशीच्या केवळ सहा इंच खालीच हे सोन्याची नाणी होते. या खोलीत काम करणाऱ्या कारागिरांना याबाबत समजताच त्यांनी या जोडप्याला बोलावलं आणि घडला प्रसंग सांगितला होता.
या जोडप्याला वाटले की जमिनीच्या आत एक विद्युत तार आहे. पण, जेव्हा त्यांनी कपाची नीट तपासणी केली असता त्यात १६१० ते १७२७ या काळातील सोन्याची नाणी आढळून आली.द सन’च्या वृत्तात सांगण्यात आले. आहे की, ही नाणी फर्नले-मीस्टर्स या श्रीमंत कुटुंबातील आहेत. जे त्या काळी प्रसिद्ध उद्योगपती होते. या कुटुंबातील सदस्य नंतर संसद सदस्य होते आणि १७ व्या शतकाच्या सुरुवातीलै व्हिग पक्षाचे सुप्रसिद्ध नेते होते.
ही नाणी मिळाल्यानंतर या जोडप्याने लंडनमधील एका लिलाव कंपनीशी संपर्क साधला. यानंतर कंपनीशी संबंधित लोक या जोडप्याच्या घरी आले. या लोकांनीच जोडप्याला सांगितले की ही सोन्याची नाणी सुमारे ३०० वर्षे जुनी आहेत.सध्या जगभरात या नाण्यांची आणि या लिलावाची चर्चा आहे.