नाशिक-येथील महाराष्ट्र एन्विरोमँटल इंजिनिरींग असोसिएशन ( मित्रा ) च्या प्रांगणात राष्ट्रीय जलद आणि अतिजलद बुद्धीबळ स्पर्धेला बुधवारी दिमाखदार प्रारंभ झाला. शनिवार पर्यत या स्पर्धा सुरु राहणार आहेत.या स्पर्धेत भारतभरातील 194 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे .या स्पर्धेतील विजेते जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पहिल्याच डावात दिल्लीच्या दक्ष योगेल यांनी इंटरनँशनल खेळाडू सौम्या स्वामीनाथन यांना पराभवाचा धक्का दिला .घड्याळ्यात असणारी वेळ संपल्याने सौम्या स्वामीनाथन यांना पराभवाचा सामना करावा लागला. सौम्या स्वामीनथन यांचा फिडे रेटींगपेक्षा दक्ष योगेल यांचे रेटिंग कमी आहेत.
तर दुसऱ्या डावात पुण्याचा कशिक जैन याने इंटरनँशनल धुलीपन प्रसाद यांच्यावर. विजय मिळवला .धुलीपन तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत आहेत.तत्पुर्वी मित्राचा सभागृहात स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन करण्यात आले. यावेळी महुआ बँनर्जी (उप संचालक मित्रा), संजय गोयल (आयुक्त आयकर नाशिक विभाग ) निरंजन गोडबोले( महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे सचिव ) , मंजूनाथ(मुख्य पंच,) विदीत गुजराथी (भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर) , विनय बेळे ,(नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष )सुनिल शर्मा,(सचिव)आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे विनायक वाडीले, विक्रम मावळंकर, अजिंक्य तरटे, माधव चव्हाण,अजिंक्य पिंगळे, भुषण पवार, मंगेश गंभीरे ,गौरव देशपांडे आदी मान्यवर स्पर्धा यशस्वीतेसाठी मोलाचे परीश्रम घेत आहे.
आपल्या उद्घाटन भाषणात सहसचिव सुनिल शर्मा यांनी नाशिक जिल्हा बुद्धिबळ.संघटनेच्या आगामी कार्यक्रमाविषयी सांगितले तर महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे सचिव निरंजन गोखले यांनी पुण्यातील आगामी स्पर्धेविषयी माहिती दिली सतिश गोयल यांनी स्पर्धेच्या प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिल्यावर काय नविन माहिती मिळाली हे सांगितले . या कार्यक्रमाचे तन्वी किरण यांनी सुत्रसंचालन केले .सदर स्पर्धाचे चेस डॉट कॉम , चेस बेस इंडिया व फॉलो चेस या संकेत स्थळावर थेट प्रक्षेपण बघता येईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे यांनी दिली .