नाशिक मध्ये भर रस्त्यात चालत्या कारने अचानक घेतला पेट 

0

नाशिक – नाशिकच्या मध्यवर्ती भागातील मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबईनाका येथे  चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली.  भर रस्त्यात बर्निग कारचा थरार बघायला मिळाला. रस्त्याने चालणा-या एका कारने अचानक पेट घेतला.चालकाचा प्रसंगावधानामुळे कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला.

भर रस्त्यात चालत्या कारने अचानक पेट घेल्याने  एकच खळबळ उडाली आहे. घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी येथे जमली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.