मराठी मालिकेच्या सेटवर शिरला बिबट्या 

(व्हिडिओ पहा)

0

मुंबई,दि. २७ जुलै २०२३ –मराठी मालिकेच्या शुटींगच्या सेटवर चक्क बिबट्या आल्याची घटना समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं बिबट्याचे बछडे मालिकेच्या सेटवर फिरत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. एननआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या सेटवर प्रवेश करताना दिसतोय.बिबट्यालाअचानक पाहताच सेटवर एकच गोंधळ उडाला आणि सेटवरील लोक सैरावैरा धावायला लागतात. बिबट्यापासून वाचण्यासाठी लोक धडपड करत असल्याचं हा व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी येथील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे शूटिंग सुरु असतांना बिबट्याने एंट्री घेतली मागील १० दिवसांमध्ये असा प्रकार तिसऱ्या,चौथ्यांदा घडला आहे.सरकारने यासंदर्भात काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे,”असं या घटनेनंतर ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी म्हटलं आहे.”सेटवर २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. या साऱ्या गोंधळात एखाद्याचा जीवही गेला असता. असं हि गुप्ता म्हणले.

मुंबईमधील फिल्म सिटीमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांचं शुटींग सुरु असते ही फिल्म सिटी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेला लागून आहे.तसेच येथून जवळच आरे कॉलिनीही आहे.मुंबईमधील हा जंगलांचा राखीव भाग आहे.मागील काही काळापासून सातत्याने या ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत असल्याने शुटींग करणं जिकरीचं काम झालं आहे.या ठिकाणी अनेकदा बिबट्या दिसून आल्याने कलाकारांबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असूनही त्याकडे सरकार फार काळजीपूर्वपणे लक्ष देताना दिसत नसल्याची खंतही गुप्ता यांनी व्यक्त केली. “सरकारने तातडीने सुरक्षेसंदर्भातील पावलं उचलली नाहीत तर फिल्म सिटीमधील हजारो कर्मचारी आणि कलाकार संपावर जातील,” असा इशारा गुप्ता यांनी दिला आहे.या घटनेनंतर अनेक वन अधिकाऱ्यांनी या सेटला आणि बिबट्या दिसला त्या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पहाणी केली
(व्हिडिओ पहा)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.