नाशिक,२५ ऑगस्त २०२२ – नाशिक मध्ये तबला प्रचार व प्रसाराचे तसेच उस्ताद अहमदजान थिरखवॉ शैलीचा प्रसार करणारी तबला अकादमी म्हणजेच आदिताल तबला अकादमी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे हे १७ वे वर्ष असून मागील २ वर्षा मध्ये कोरोना मुळे हा कार्यक्रम कार्यक्रम होऊ शकला नाही . या वर्षी शनिवार दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता विशाखा हॉल कुसुमाग्रज स्मारक येथे तबला वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ..गुरुपौर्णेमेचे अवचित्त साधत या कार्यक्रमामध्ये ८० विद्यार्थी आपला सहभाग नोंदवणार आहे ..
या कार्यक्रमात प्रारंभिक ते अलंकारपूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वादन होणार असून ताल त्रिताल ,ताल झपताल ,ताल सवारी ,ताल रुद्र आदी तालां मध्ये पेशकार ,कायदे ,रेले ,गत ,परण ,आदींचे सादरीकरण होणार आहे .सदर कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून ,रसिकांनी कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावावी असे आव्हाहन आदितालच्या शिष्य मंडळींनी केले आहे.