लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय,देशात बेबंदशाहीला सुरुवात : उद्धव ठाकरे
शिवसैनिकांनो खचू नका उद्धव ठाकरेंचे आवाहन
मुंबई,१७ फेब्रुवारी २०२३ – मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल सर्वात महत्त्वाचा निकाल जाहीर केलाय. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे. दुर्देवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही. ७५ वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षाचा स्वातंत्र्याचा संपलेला आहे आणि आता देशातील लोकशाही संपवून आम्ही बेबंधशाहीला सुरुवात केलेली आहे. आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिलेले आहेत की जिथे सरकारची दादागिरी चाललेली आहे. शिवसैनिकांनो खचू नका असे आवाहन उद्धव ठाकरेंचे केले.
गेले काही दिवस केंद्रीय कायदामंत्री बोलतायत. राज्यसभेचे अध्यक्ष बोलतायत त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे सुद्धा अधिकार पाहिजे. देशातील लोकशाही संपलेली आहे लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली आजचा हा जो काही निर्णय आहे तो अत्यंत अनपेक्षित आहे
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी मधल्या काळातील आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाचा आणि निकाल कोणाच्या बरोबर आहे? हे जर का केवळ आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर मग मात्र कोणी धनाड्य माणूस निवडून आलेला आमदार-खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो
मला आता असं वाटतंय की जसं न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त विरोधी पक्षांना सोबत घेऊन सुरुवात करण्याची आता गरज आहे.शेवटी जोरात असतो आमच्यातल्या गद्दारांची झालेली आहे त्यांना मांडीवर घेतलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे जे धैर्य अवस्था झालेली आहे त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाहीये. मी अनेकदा त्याला आवाहन दिलेला आहे की हिम्मत असेल तर निवडणुका घ्या अगदी लोकसभा पासून महापालिका तुम्ही एकटी निवडणूक घेण्याची काय त्यांची हिम्मत झाली नाही आता मला अशी शक्यता वाटायला लागलेले की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे हिंदी गटाला दिलेला आहे म्हणजेच असं की कदाचित येत्या महिन्यात दोन महिन्यांमध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील
उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?
*काय सुरुवात करायची आणि काय बोलायेच हा मोठा प्रश्न देशात तयार झाला आहे
*आजचा निर्णय लोकशाहीसाठी मोठा घातक
*लोकशाही संपली आहे असे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावे
*देशात बेबंदशाही सुरू झाली आहे हे मोदींनी जाहीर करावे
*कोर्टातील निकाल लागेपर्यंत आयोगाने निर्णय देणे चुकीचे
*राजमान्यता दिली तरी चोर हा चोरच असतो
*धनुष्यबाण चोरले
*या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार
*बाळासाहेबांनी पुजलेलं धनुष्यबाण आमच्याकडे आहे
*धनुष्यबाणाचे तेज जनता मिंधे गट आणि भाजपला दाखवणार