आम्ही सारे खवय्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई,२१ सप्टेंबर २०२२ – असं म्हणतात की, माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ नित्यनियमाने करत होता. पण आता जवळपास २ वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा एकदा भेटीस येतोय.

‘प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे’ हेच ह्या पर्वाची सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत, कोल्हापूर पासून या पर्वाची सुरुवात होत असून महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटी मध्ये आम्ही सारे खवय्ये रंगणार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी हे या नवीन पर्वाचे नाव असून या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत आणि कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.

या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे.‘आम्ही सारे खवय्ये’ २६ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा.झी मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!