आयमाच्या प्रदर्शनास तीन दिवसांत तब्बल ७५ हजार लोकांची भेट
आयमाच्या पुढाकाराने येत असलेल्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना - खा.हेमंत गोडसे
नाशिक-आयमातर्फे डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित चार दिवसांच्या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप सोमवारी(दि.२१ ) रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अनबलगन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी.यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.दरम्यान रविवारी सुटी असल्याने आणि प्रदर्शन बघण्याची वेळ एक तासाने वाढवून दिल्याने ते बघण्यास आबालवृद्धांची तिसऱ्या दिवशीही गर्दी उसळली असल्याचे चित्र दिसले.आत्तापर्यंत तीन दिवसांत तब्बल ७५ हजारांहून अधिक लोकांनी प्रदर्शनस्थळी भेट देऊन उद्योजकांचा उत्साह वाढविला.
अगदी नटबोल्टपासून ते महाकाय अवजारे प्रदर्शनात बघण्यास उपलब्ध आहेत.सेल्फी पॉईंट तसेच सुखोई विमानाची प्रतिकृती हेसुद्धा उपस्थितांना आकर्षित करीत असल्याने प्रदर्शनाची रंगात आणखी वाढली आहे.प्रदर्शनात B2B अंतर्गत मोठ्या कंपन्या आणि उद्योजकांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली तसेच उद्योजकांना बसजारपेठा उपलब्ध करून देऊन त्यांच्या उत्पादनांची खरेदी करण्याचे आश्वासनही दिले.यावेळी उद्योग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी विविध परिसंवादाद्वारे उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसनही केले.
दरम्यान काल प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये खा.हेमंत गोडसे,औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर,पिंपरी-चिंचवड चेंबर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ,आप्पासाहेब शिंदे,उपाध्यक्ष रंगनाथ गाडगेपाटील,उद्योजक रत्नदीप गिरासे,रावसाहेब पाटील,प्रफुल्ल जैन,संदीप लोया,मंगेश सोनक, सौरभ जगदाळे,वैभव माने आदींचा समावेश होता.
सोमवारी समारोप : एमआयडीसीचे सीईओ पी.अलबनगन प्रमुख पाहुणे
प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रम सायंकाळी सोमवार दि.२१ मार्च रोजी ५ वाजता होणार असला तरी प्रदर्शन जनतेसाठी रात्री ८.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे याची सर्वानी नोंद घ्यावी,असे आवाहन आयमाचे विद्यमान चेअरमन निखिल पांचाळ यांनी केले.
प्रदर्शन भरवणे हे धाडसच
कोविडचा प्रभाव बऱ्याचप्रमाणात कमी झाल्याने उद्योग जगताला बूस्ट देण्याच्या उद्देशाने मोठया धाडसाने आम्ही प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी त्याच्या यशस्वीतेबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या.परंतु हे प्रदर्शन कमालीचे यशस्वी झाले आहे.तीन दिवसांतच 75 हजारांहून अधिक लोकांनी या प्रदर्शनास हजेरी लावली आहे.सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने गर्दीचा उच्चांक होईल यात शंका नाही. — ललित बूब,
सरचिटणीसअंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
आयमाच्या पुढाकाराने येत असलेल्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना – खा.हेमंत गोडसे
तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची ओळख आताऔद्योगिक जिल्हा अशी झाली असून आयमाच्या माध्यमातून येथे येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी आपण आयमा बरोबर सदैव प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन खा.हेमंत गोडसे यांनी यांनी केले आयमातर्फे डोंगरे वस्तीगृह मैदानावरवर आयोजित औद्योगिक प्रदर्शनात खा.हेमंत गोडसे यांनी रविवारी भेट दिली व नंतर प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची वैयक्तिकरीत्या पाहणी करून उद्योजकांशी चर्चा केली व त्यांच्या उत्पादनाचीची माहिती जाणून घेतल्यानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींची संवाद साधताना ते बोलत होते.
नाशकात गोवर्धन येथे ३० एकरमध्ये होऊ घातलेल्या सिपेट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहे.या प्रकल्पाला नुकतीच केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे दरवर्षी दोन हजार तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होणार आहे,असेही खा.गोडसे यांनी सांगितले.तसेच नाशकात होऊ घातलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल.सद्या या टेस्टिंगसाठी भोपाळला धाव घ्यावी लागते.मात्र नाशकात ही लॅब झाल्यानंतर उद्योजकांची भोपाळ वारी टळेल आणि वेळ तसेच पैशांची मोठी बचत होईल,असेही त्यांनी निदर्शनास आणले.इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर नाशिक जिल्ह्यात व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी १०० एकर जागेची मागणी केली आहे. व तसे निर्देश जिल्हाधिकारी यांना जागा बघण्यासाठी चे प्राप्त झाले आहेत,सद्या पाईपलाईनमध्ये असलेल्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला गती मिळावी यासाठीही आपली प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे,असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाव्यापी मंच तयार करून आयमाने त्याचे नेतृत्व करावे असे सांगतांनाच आयमाच्या माध्यमातून नाशकात ८५० कोटींचे ३ प्रकल्प येणार असल्याने त्याबद्दल त्यांनी प्रदर्शन चेअरमन धनंजय बेळे आणि त्यांच्या टीमचे त्यांनी कौतुक केले.प्रारंभी बेळे आणि आयमाचे विद्यमान चेअरमन निखिल पांचाळ यांच्या हस्ते खा.गोडसेंचा सत्कार करण्यात आला. ललित बूब,वरुण तलवार,योगिता आहेर यांच्यासह पदाधिकारी तसेच सतिश कोठारी उपस्थित होते.
नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यास नाशिक-घोटी दरम्यान जागेचा शोध सुरू : काटकर यांची माहिती ,आयमाच्या डिरेक्टरीचे प्रकाशन
अंबड,सातपूर आणि सिन्नर पूर्णतः पॅक झाल्याने नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यास आता नाशिक ते घोटी दरम्यान जागेचा शोध सुरू आहे,अशी माहिती महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर यांनी दिली
आयमा इंडेक्स 2022 प्रदर्शनाच्या डिरेक्टरीचे प्रकाशन काटकर यांच्या हस्ते तसेच प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, आयमा प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे,निखिल पांचाळ,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र पानसरे,ललित बूब,गोविंद झा,योगिता आहेर,राजेंद्र कोठावदे,वरूण तलवार, जितेंद्र आहेर,प्रमोद वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना काटकर बोलत होते.
समृद्धी महामार्ग,मुंबई -नागपूर दरम्यान लवकरच सुरू होणारी बुलेट ट्रेन आणि नियोजित सुरत-चेन्नई महामार्ग यामुळे नाशिकला मोठे महत्व प्राप्त होणार आहे. समृद्धीचे टर्मिनल एंड नाशिकला नसले तरी समृद्धीचा फायदा नाशिकला मिळवून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. माळेगावची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.नाशिक जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे त्यामुळे डेस्टिनेशन नाशिकचे स्वप्न निश्चितच साकार होईल.नाशिकला फुड हब कसे करता येईल या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे काटकर यांनी पुढे नमूद केले.जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा आणि त्यांचे प्रश्न धसास लावण्याचा आयमाचा प्रयत्न स्तुत्य आहे.नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ आयमाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
प्रास्ताविक प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी केले उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी नाशिक डेस्टिनेशन ही संकल्पना दृढ करावी आणि मोठ्या गुंतवणुकीचे जास्तीतजास्त प्रकल्प नाशकात यावेत साठी औद्योगिक विकास महामंडळातर्फे शर्थीचे प्रयत्न व्हावेत.नाशिकचे बहुसंख्य लघुउद्योग आता मल्टिनॅशनल झाले आहेत.जलदगतीने विकसित होणाऱ्या शहरांत नाशिकचा जगात सोळावा आणि देशात चौथा क्रमांक लागतो.नाशकात पोटेंशियल भरपूर असल्याने येथे औद्योगिक विकासाला मोठ्याप्रमाणात चालना मिळू शकेल आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पावले उचलावीत अशी अपेक्षा बेळे यांनी व्यक्त केली.प्रारंभी निखिल पांचाळ आणि ललित बूब यांच्या हस्ते काटकर आणि गवळी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आर.एस.नाईकवाडे,विनायक मोरे, दिलीप वाघ अविनाश मराठे जयदीप अलीम चंद्वानी हर्षद बेळे जगदीश पाटील,जयंत जोगळेकर,राहुल गांगुर्डे,देवेंद्र राणे,जयंत पगार,अविनाश बोडके,हर्षद ब्राह्मणकर,गौरव धारकर,विराज गडकरी,मेघा गुप्ता,हेमंत खोंड,रवींद्र झोपे,के.एन.पाटील,मनीष रावळ,सुमीत बजाज,नितेश नारायणन,सिद्धेश रायकर,सतीश कोठारी,आदी उपस्थित होते