देवळाली कॅम्प जवळ पवन एक्सप्रेसला अपघात :११ डबे रुळावरून घसरले

*पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरुण घसरल्यामुळे पंचवटी व नंदीग्राम एक्सप्रेस रद्द; काही गाड्यांचे मार्ग बदलले

0

नाशिक – देवळाली कॅम्प ते लहवीत दरम्यान पवन एक्सप्रेसला अपघात झाला असून गाडीचे ११ डबे रुळावरून घसरल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहे. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून मदत कार्य सुरु आहे.

या अपघातामुळे मुंबई नाशिकची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले असून एकचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.हि गाडी इगपुरीहून निघाली असतांना नाशिक जवळ देवळाली कॅम्प ते लहवीत जवळ गाडीला अपघात झाला.

या बाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिनस वरून आज सकाळी साडे अकरा वाजता भुसावळ कडे जाणारी पवन दरभंगा एक्स्प्रेस इगतपुरी स्थानक सोडल्या नंतर नाशिक कडे येत असताना लहवीत स्थानका दरम्यान रुळा वरून घसरली. गाडी चा वेग ताशी ९० किलोमीटर असल्याने वातानुकूलित व स्लीपर कोचच्या  दहा ते अकरा  बोगी घसरून रुळा पासून वेगळ्या झाल्या या मुळे मोठ्या प्रमाणात रूळ उखडले गेले. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू  झाल्याचे वृत्त आहे.अनेक प्रवासी उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.

या अपघातामुळे मुबंई वरून येणारी पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती आहे, या नंतर अनेक गाड्या रद्द होऊ शकता किंवा पुणे मार्ग रवाना होऊ शकता. रेल्वे चे अनेक अधिकारी घटनास्थळी रवाना होत आहे

 

Pawan Express Accident

Pawan Express Accident

Pawan Express Accident

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.