नाशिक,दि.२५ सप्टेंबर २०२३ – अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री तमन्ना बांदेकर यांचा अभिनयाने आणि स्वरांच्या लयीला तालबद्ध साथ देत थिरकणारी तरुणाई. साठी असलेल्या ‘मधावानी गोड’या गाण्याचे लॉंचिंग बुधवार दि.२७ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता येथील SSK सोलीटीयर या हॅाटेल मध्ये होणार आहे अशी माहिती गाण्याचे सादरकर्ते पार्थसारथी राजेंद्र चव्हाण यांनी तसेच एम डी आर ॲन्ड सन्स फिल्मस यांनी दिली आहे
गाण्याचे दिग्दर्शन सुराज कुटे यांनी केले असुन नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि शहरातील परीसरात झालेले आहे, याचे छायाचित्रण व संकलन संवाद देशमुख यांनी केले आहे, या गाण्याचे संगीत विकी अडसुले यांचे असुन निलेश धुमाळ आणि विकी अडसुळे यांनी या गीतीची रचना केली आहे, गायीका सोनाली सोनावणे आणि गायक अनुराग गोडबोले यांच्या मधुर आवाजात हे गाणे तयार झाले आहे, निर्मीती व्यवस्थापन दानिश शेख यांनी केले असुन नाशिकचे स्थानिक कलाकार दिपक गांभीरे, शाम कुलकर्णी, मनीषा पवार यांनी काम केले आहे,
तसेच “तु गजानन” या गाण्याचे ही लॉन्चिंग होणार असून या मध्ये ही अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री तमन्ना बांदेकर यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे, या गाण्याचे शुटिंग शहरातील साधना मिसळ वाडा येथे झाले असुन याचे दिग्दर्शन सुराज कुटे यांनी केले आहे, नृत्यदिग्दर्शक सागर जाधव यांनी त्यांच्या एस आर जे डान्स ॲकॅडमी तर्फे २४ डान्सर सोबत घेवुन या गाण्याची कोरिओग्राफी तयार केली, छायाचित्रण आणि संकलन किशोर देवरे यांनी केले असुन निर्मिती व्यवस्थापन तुषार देवघरे यांनी केले आहे,
कलादिग्दर्शक गजानन तांबे आणि जयदीप पवार यांनी गाण्यासाठी भव्यदिव्य असा सेट तयार केला होता, रंगभुषा आणि वेषभुषा यांचे काम मुंबईचे सुनिल शॅा आणि तबस्सुम तसेच नाशिकच्या रंगभुषाकार पियु पवार यांनी देखील अतिशय सुंदर असे काम केले आहे, क्रिष्णा मर्कट आणि त्यांच्या टिम कडुन या गाण्यासाठी नाशिकच्या स्थानिक कलारांना प्राधान्य देण्यात आले होते, तसेच या गाण्यातील काही भाग कल्पतरु मल्टिस्पेशालीस्ट हॅास्पीटल येथे चित्रीत करण्यात आला असुन डॅां. वैभव अंकुशराव महाले आणि त्यांच्या सहकार्यांनी या गाण्यात महत्वाची भुमीका केली आहे,“तु गजानन” या गाण्याचे संगीत विकी अडसुळे यांनी दिले असुन शब्द संकेत तटकरे यांनी लिहीलेले आहे, सुप्रसिध्द गायक हर्षवर्धन वावरे आणि सुप्रसिध्द गायीका मुग्धा कर्हाडे यांच्या सुमधुर आवाज ह्या गाण्याला लाभलेला आहे, त्रिशुलीन सिने व्हिजन आणि पार्थसारथी राजेंद्र चव्हाण हे या गाण्याचे सादरकर्ते आहेत अशी माहीती या गाण्याचे मार्केटिंग करणारे एम डी आर ॲन्ड सन्स कंपनी देण्यात आली आहे