अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा 

0

आजचा रंग- जांभळा

Pallavi Vaidya
पल्लवी वैद्य (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)

मुंबई,२२ ऑक्टोबर २०२३ – प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल यांना मोठा धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे.या ६५ वर्षीय अभिनेत्याला दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे दलीप ताहिल यांना मद्यपान करुन चारचाकी चालवल्याप्रकरणी हि शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे संपूर्ण प्रकरण २०१८ सालचे आहे.तेव्हा दलीप ताहिल हे दारूच्या नशेत गाडी चालवत असताना एका ऑटो रिक़्शाला धडकले होते.त्या अपघातात रिक़्शा चालकासह एक महिला गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणामध्ये कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. कोर्टासमोर डॉक्टरांच्या अहवालामध्ये अपघात झाला तेव्हा अभिनेता मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होता असं नमूद करण्यात आलं आहे.

इन्स्टाग्रामवरील ‘व्हिरल भयानी’ या मनोरंजन विषयक वृत्तांकन करणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. जिल्हा कोर्टाने दलीप यांना ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. कोर्टाने या प्रकरणामध्ये दलीप यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.दलीप हे सध्या ६५ वर्षांचे असून आता त्यांच्याकडे ही शिक्षा भोगणे किंवा या निर्णयाविरोधात वरिष्ठ कोर्टामध्ये अर्ज करणे असे दोन पर्याय आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.