अभिनेता श्रेयस तळपदे,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना यंदाचा “सुविचार गौरव” पुरस्कार जाहीर
दत्ता पाटील,डॉशेफाली भुजबळ,डॉ.भाऊसाहेब मोरे,गौरी घाटोळ,चंद्रशेखर सिंग,संगिता बोरस्ते,रामचंद्रबापू पाटील,प्रा.नानासाहेब दाते यांचा हि होणार गौरव
नाशिक दि.२१ एप्रिल २०२३ –समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेता श्रेयश तळपदे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना यंदाचा “सुविचार गौरव” पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहितीसंयोजक आकाश पगार यांनी दिली आहे.
बुधवार दि. ०३ मे २०२३ रोजी सांयकाळी ५ वाजता सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते व माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील महाकवी कालिदास सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे आज जाहीर करण्यात आली.
यामध्ये चित्रपट अभिनेता श्रेयश तळपदे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना विशेष सुविचार गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ.भाऊसाहेब मोरे (सुविचार जीवन गौरव) तसेच समाजासाठी आयुष्यभर कार्य केलेले शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. शेफाली भुजबळ (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक दत्ता पाटील (साहित्य), उद्योजक चंद्रशेखर सिंग (उद्योग), श्रीमती. संगिता बोरस्ते (कृषी), मार्शल आर्ट महिला कुस्ती संघ खेळाडु गौरी घाटोळ (क्रीडा), प्रा.नानासाहेब दाते (सहकार) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे यांचे अध्यक्षतेखाली जेष्ठ साहित्यिक प्रा.विनोद गोरवाडकर व आय.एम.आर.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सुर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार मोबा. ९४२१५६३५५५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.