मुंबई – झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी म्हणजे राणा दा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर.येणाऱ्या काळात हि जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असली तरी या दोघांच्याही आयुष्यातील लग्नाआधीची हि सगळ्यात मोठी गुडन्यूज समोर आली आहे.
हि गुडन्यूज म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही आगामी मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मध्यंतरी अक्षया आणि हार्दिक दोघेही लंडन दौऱ्यावर होते. त्यांचे फोटो हि सोशल मीडियात चर्चेत होते आता या लंडन दौऱ्यात काय घडलंय ते समोर आलं आहे.
लवकरच या दोघांना अजून एकदा एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आजपर्यंत टीव्हीवर गाजलेली हि जोडी आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. लवकरच हे दोघे एकत्र चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. नुकतंच या दोघांच्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘चतुर चोर’ या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच लंडन येथे पार पडलं आहे. या सिनेमात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण देखील दिसणार आहे. किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक हे या नव्याकोऱ्या चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल गोळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि छायाचित्रण केलं आहे. याशिवाय चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे.
नुकतंच त्यांच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. सध्या तरी ‘चतुर चोर’ हा हॉरर कॉमेडी असलेला सिनेमा असल्याचं समोर आलं आहे. नुकताच लंडनमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडल्याचं सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/amol_kagne_official/?utm_source=ig_embed&ig_rid=b38138fa-1966-43da-bb1d-b3b6f4aa97cc