मुंबई – आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्या आहेत. अभिनेत्री केतकी चितळेनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट केली होती.त्यानंतर तीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.आज पोलीस कोठडीची मुदत संपल्या नंतर तीला न्यायालयात हजर केले असता.ठाणे न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील सुनावणीवेळी केतकीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला होता.ठाणे न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यात जवळपास १५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलिस ठाण्यात देखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकीनं कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला होता. केतकीनं सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की, मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं होतं.