मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं केतकी चितळेला चांगलंच भोवलंय. केतकी चितळेला न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी शनिवारी केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे यावेळी केतकी चितळे हीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शरद पवार यांच्यावर वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर आता केतकी चितळेच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. केतकी चितळेवर कारवाई व्हावी, यासाठी सगळ्यात आधी कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अखेर तिच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.
नाशिकमध्ये हि गुन्हा दाखल
अभिनेत्री केतकी चितळेंनी शरद पवार यांच्यावर पोस्ट करत खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे.तर अभिनेत्री केतकी चितळे ला पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अटक ही केली.मात्र याच वादग्रस्त पोस्टवर कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी केतकी चितळे विरोधात नाशिकमध्ये सायबर सेलकडे तक्रार केली असून पोलिसांनी तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.