मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात

0

मुंबई –अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला असून या अपघातात मलायका जखमी झाली आहे.खालापूर टोलनाक्याजवळ दुपारी तीन ते चारच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लागल्याने तीन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघात मलायकाच्या ड्राईव्हरला आणि बॉडिगार्डला मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.

मलायकाला सध्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचे सिटी स्कॅन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिला पुढेचे काही तास निरिक्षणात ठेवणार असल्याचाही माहिती मिळाली आहे. या अपघातात तिला डोक्याला दुखापत झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर झालेल्या या अपघाताच्या घटनेची पोलिस चौकशी करत असून तपास करून एफआयआर नोंदवला जाईल असे सांगण्यात आले आहे. या अपघातात तीन वाहनं एकमेकांवर आदळली आणि तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. यात मनसेच्या गाडीचेही मोठं नुकासन झालं आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की यात मलायकाच्या गाडीच्या मागच्या सर्व काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.