दशक अठरा समास दहा श्रोता अवलक्षण निरुपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. कोणी एखादे कार्य हाती घेतलं तर काहीतरी त्याच्यामध्ये अडथळा येतो. काळ अनुकूल असला तर ते आपोआप होत जातं. कार्यभाग होत चालला की प्राणी उल्हसीत व्हायला लागतो आणि त्याला दिवसेंदिवस नवे विचार सुचू लागतात. कोणीएक प्राणी जन्माला येतो, काहीतरी काळाचे सहाय्य मिळते, दुःखांनंतर देव कृपाळूपणे सुख देतो. काही काळ अनुकूल झाला तर मग सगळेच राजे झाले असते. पण काही काळ चांगला असतो काही वाईट असतो.इहलोक किंवा परलोक हे विवेक साधला तर त्याला साध्य शकतात, हे स्वाभाविकपणे घडले तर ईश्वराचं अद्भुत देणं आहे. ऐकल्याशिवाय कळलं, शिकवल्या शिवाय शहाणपण आलं हे भूमंडळावर ऐकले नाही पाहिले नाही.
सगळं काही ऐकल्यावर समजतं. कळता कळता वृत्ती शांत होतात आणि मनामध्ये सारासार विचार आकलन होतो.श्रवण म्हणजे ऐकणे.मनन म्हणजे मनात ठेवायचं.या उपायामुळे त्रैलोक्य चालते. श्रवण करताना अडथळे येतात, किती सांगायचे? सावध असल्यास सर्व अनुभव येतात.श्रवणासाठी लोक बसले, बोलता बोलता एकाग्र झाले, नंतर काही नवीन लोक आले ते एकाग्र होत नाहीत. माणूस बाहेर हिंडून आले. नाना प्रकारचे ऐकलेले असतं ते गडबड करायला लागतात. शांतता राहत नाही. प्रसंग पाहून वागतात असे थोडे असतात. श्रावणात नाना अडथळे येतात ते कोणते ते ऐका. ऐकायला बसल्यानंतर शरीर साथ देत नाही त्यामुळे कडकडा जांभया देतात, निद्रा येते.मनाला ते सांगतात की इकडे आहेत पण ते मन ऐकत नाही. मागे बरेच काही ऐकलं होतं तेच धरून बसतात. शरीर तयार असलं तरी मनामध्ये काही वेगळे विचार असतात. त्या कल्पनांचा विस्तार किती म्हणून सांगायचा? जे जे काही कानावर पडले ते ते समजून त्याचा विचार केला तरच निरुपणाचे काही सार्थक होईल, पण मन ही दृश्य वस्तू असती तर तिला बाजूला करता आली असती. तसं नाही म्हणून त्याला आवरावं लागतं आणि आवरून अर्थाच्या ठिकाणी लक्ष द्यावे.
निरूपणासाठी येऊन बसला, पण तो भरपूर जेवण करून आला.बसल्यानंतर तिथे त्याला तहान लागली मग त्याने काय केलं? पाणी मागवलं आणि घटघटा उदंड पाणी प्यायला.आता पाणी प्यायल्यामुळे त्याला मळमळायला लागलं. तो पुन्हाउठून गेला. मग त्याला करपट ढेकर उचक्या आल्या, नंतर वारा सरल्यावर त्याची फजिती झाली. क्षणोक्षणी लघुशंकेला उठून जायला लागला. मग त्याला शौचास लागली. कासावीस झाला. मग सगळे सोडून तिकडे धावला.निरूपणप्रसंगी तो अशाप्रकारे निघून जायला लागला.दृष्टांतामध्ये काहीतरी अपूर्व अशी माहिती आली आणि अंत:करण तिथेच राहिलं त्यामुळे कुठवर काय वाचले काही कळेना.
निरूपणाला येऊन बसला आणि विंचवाने डंख मारला. मग कसलं निरूपण अन कसलं काय..कासावीस झाला.पोटामध्ये तिडीक उठली.पाठीमध्ये करक भरली.पायांचे सांधे धरले गेले.बसवे ना. पिसवा चावून पळाल्या. त्यामुळे प्राण्याचा चित्त विचलित झालं.कुठेतरी गडबड झाली गोंधळ झाला तिकडेच धावला.श्रवणासाठी विषयी लोक येतात आणि ते बायकांकडेच पाहत राहतात. चोरटे लोक चप्पल चोरून जातात.अशा अनेक अडचणी येत असतात.त्याचं मनोरंजक वर्णन समर्थ करीत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७