दशक एकोणावीस समास दहावा विवेक लक्षण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. जिथे अखंड उपक्रम, जिथे अखंड नाना विचार, जिथे अखंड राजकारण तेथे हे सर्व मन घडवून आणत असते. सृष्टीमध्ये जितके उत्तम गुण आहेत, तितके निरूपण चालते. निरुपणाशिवाय एक क्षणही रिकामा जात नाही. चर्चा शंका प्रश्न, उत्तरे कोण खोटे कोण खरे.. नाना वक्तृत्व शास्त्र आधारावर नाना चर्चा होतात. भक्ती मार्ग विशद केला जातो. उपासना मार्ग समजतो. ज्ञान विचार अंतर्यामी स्थिरावतो. वैराग्याची खूप आवड असते.
उदास वृत्तीची गोडी असते भरपूर काम असते, उदंड उपासना असते पण तरीसुद्धा वियोग, अलिप्ततेचा योग येत नाही. प्रबंधाची पाठांतर, प्रश्नांना समर्पक उत्तर, नेमकं बोलून लोकांची अंतःकरणे शांत करावी. लोकांना त्याची खूप आवड निर्माण होते तिथे कोणाचे काही चालत नाही. समुदायाची गर्दी होते तरी कोणासही त्याचे आकलन होत नाही. उपासना करून पुढे पुढे ते न्यायचं. भूमंडळी सगळीकडे ते आणायचं हे जाणत्या मंडळींचे काम आहे. जाणते लोक मात्र आढळत नाहीत, काय करतो ते कळत नाही, नाना देशाचे नाना लोक येऊन जातात. त्या सगळ्यांची मनधरणी करावी, त्यात विवेक विचार भरावे. त्याच्यामध्ये दुःखी कष्टी झालेली, आडमार्गात गेलेली असतात त्यांना शांत करावं, सुखी करावं. किती लोक ते समजत नाही किती समुदाय ते समजत नाही सगळे लोक श्रवण मननामध्ये घालावे. फडातील लोकांना समजवावं, गद्यपद्य सांगावं, त्यांचं मन राखाव. असा ज्याचा नियम आहे, जो अखंड विवेक पाहतो, त्यामुळे अविवेक येणार नाही. आपल्याला जितकं माहिती आहे तितकं हळूहळू शिकवावं.
जास्तीत जास्त लोकांना शहाणं करून सोडावं. परोपरीने शिकवावं, आडलं तर सांगत जावं. निःसंदेहपणे शिकवायचे. त्यांच्या शंका दूर करायच्या. होईल ते आपण करायचं. जे आपल्याकडून होत नाही ते इतर लोकांकडून करून घ्यायचं. भगवत भजन विसरणे हा धर्म नव्हे. आपण करायचं आणि करवून घ्यायचं. आपण पटवायचे आणि इतरांकडून पटवून द्यायचे.. आपण भजनमार्ग धरायचा आणि इतरांना धरायला लावायचा. जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नूतन प्रांत धरला पाहिजे. जितकं होईल तितकं करायचे. आळस करायचा नाही. देहाचा अभ्यास म्हणजे शारीरिक कष्ट केले नाही म्हणजे महंत बुडाला. त्यामुळे तातडीने नूतन लोकांना शहाणं करायचं. उपाधीमध्ये सापडायचं नाही पण उपाधीला कंटाळाच पण नाही आणि कामचुकारपणा कोणाविषयी आळस उपयोगाचा नाही. काम नासणार आहे ते नासत..
आपण वेड्यासारखं पाहतो. आळशी हृदयशून्य असतील तिथे काय करणार? धकाधकीचा मामाला असतो अशक्ताला तो काही सहन होत नाही म्हणून नाना बुद्धी युक्ती शक्तिमान असेल त्याला शिकवाव्या. होईल तोपर्यंत व्याप करावा. व्याप नाही जमला तर उठून जावं. आनंदाने कुठेतरी फिरावे. उपाधीपासून सुटला की मग निस्पृहपणा वाढीला लागला. जिकडे अनुकूल तिकडे सावकाश चालला. कीर्ती पाहायला गेलं तर सुख नाही. सुख पाहिलं तर कीर्ती नाही. कुठेही केलं नाही तर काहीच नाही. एरवी काय राहतं? होणार तितकं होऊन जातं. प्राणी मात्र उगीचच स्वतःला अशक्त,दुर्बल समजत असतो. आधीच त्याने चिवटपणा, प्रयत्न सोडला, मध्येच धैर्य सोडलं तर संसाराला शेवटाला कसा नेता येईल? संसार हा मुळीच नासका नाही. तो विवेकपूर्वक नीटनेटका करावा. नीटनेटका केला की फिका होत जातो. अनाकर्षक होत जातो, असा त्याचा स्वभाव आहे. हे पाहिल्यावर मनाच्या लक्षात येत पण अनेकांना धीर धरवत नाही, धीर सोडल्यावर काय होतं? सगळं सहन करावं लागतं! नानाबुद्धी नाना मत हे सगळं शहाणा माणूस जाणतो. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आहे विवेक लक्षण निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७